घरमनोरंजनसुशांत सिंगच्या स्मृतीप्रित्यर्थ केदारनाथमध्ये उभारणार फोटोग्राफी पॉईंट

सुशांत सिंगच्या स्मृतीप्रित्यर्थ केदारनाथमध्ये उभारणार फोटोग्राफी पॉईंट

Subscribe

सुशांतने केदारनाथ या चित्रपटात महत्त्वाची भूमिका बजावली होती. २०१३ साली केदारनाथ येथे आलेल्या महाप्रलयावर हा चित्रपट आधारित होता. या चित्रपटाने प्रेक्षकांची चांगलीच वाहवा कमावली. तसेच, या चित्रपटानंतर केदारनाथला जाणाऱ्या भाविकांमध्ये वाढ झाली. त्यामुळे उत्तराखंड सरकारने त्याच्या स्मृतीप्रित्यार्थ फोटोग्राफी पॉईंट बनवण्याचा निर्णय घेतला आहे.

सुशांत सिंग राजपूतच्या स्मृतीप्रित्यर्थ उत्तराखंड सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सुशांतच्या नावाने केदारनाथ येथे फोटोग्राफी पॉईंट उभारण्यात येणार आहे. १४ जून रोजी सुशांतचा स्मृतीदिन आहे. त्यापार्श्वभूमीवर उत्तराखंड सरकारने हा निर्णय जाहीर केला आहे. (Sushant Singh Rajput photography point will be made in Kedarnath in the name of actor congress objected)

सुशांतने केदारनाथ या चित्रपटात महत्त्वाची भूमिका बजावली होती. २०१३ साली केदारनाथ येथे आलेल्या महाप्रलयावर हा चित्रपट आधारित होता. या चित्रपटाने प्रेक्षकांची चांगलीच वाहवा कमावली. तसेच, या चित्रपटानंतर केदारनाथला जाणाऱ्या भाविकांमध्ये वाढ झाली. त्यामुळे उत्तराखंड सरकारने त्याच्या स्मृतीप्रित्यार्थ फोटोग्राफी पॉईंट बनवण्याचा निर्णय घेतला आहे.

- Advertisement -

अशाप्रकारचा पॉईंट तयार करण्याचे आदेश उत्तराखंड राज्याचे पर्यटन मंत्री संतपाल महाराज यांनी संबंधित विभागाला दिले आहेत.

सतपाल महाराज म्हणाले की, अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या नावे केदारनाथ येथे फोटोग्राफी पॉईंट बनवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याने केदारनाथ ही अत्यंत चांगली फिल्म बनवली होती. त्यामुळे त्याचा चांगला फोटो लावून आम्ही श्रद्धांजली अर्पण करणार आहोत.

- Advertisement -

बॉलिवूडला उत्तराखंडमध्ये आणण्यासाठी उत्तराखंड सरकारचे प्रयत्न आहेत. इथे चांगले चांगले चित्रपट बनावेत आणि पर्यटन क्षेत्राला वाव मिळावा असा यामागचा उद्देश आहे.

मात्र, उत्तराखंड सरकारच्या या योजनेला काँग्रेसचे महासचिव आणि माजी मुख्यमंत्री हरीश रावत यांनी विरोध केला आहे. केदारनाथमध्ये भगवान शिव विराजमान आहेत. अशाठिकाणी एका मानवाचे स्मृतीचिन्ह कसे काय बसवले जाऊ शकेल? ज्याठिकाणी भगवान केदार आहेत, भगवान बदरीनाथ आहेत, तिथे अशा प्रकारचे पॉइंट्स कसे काय बनवले जाऊ शकतात, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -