घरमहाराष्ट्रमविआ सत्ता पाडण्याच्या प्रयत्नात दहिसरमधील 'या' दोन आमदारांचा सहभाग

मविआ सत्ता पाडण्याच्या प्रयत्नात दहिसरमधील ‘या’ दोन आमदारांचा सहभाग

Subscribe

शिंदे गट आता कायदेशीर बाबी पूर्ण करत भाजपसोबत सत्ता स्थापनेसाठी सज्ज झाला आहे. याच सत्ता स्थापनेत आता एक उद्धव ठाकरेंचे उजवे आणि एक देवेंद्र फडणवीस यांचे उजवे असणाऱ्या दोन आमदारांची मदत होणार आहे

शिवसेना नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे राज्यातील महाविकास आघाडीला भगदाड पडले आहे. शिंदेंनी आत शिवसेनेचे 41 आणि अपक्ष 6 असे मिळून 47 आमदार आपल्यासोबत असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार अल्पमतात जात सत्तेची सूत्र ही शिंदे गटासह भाजपकडे येण्याचे चित्र स्पष्ट आहे. यासाठी आज एकनाथ शिंदे आपला गट हीच खरी शिवसेना असल्याचं म्हणत गटाच्या अधिकृत मान्यतेसाठी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पत्र देणार आहेत.

दरम्यान महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आणण्याच्या प्रयत्नात दहिसर बोरिवलीमधील एकमेकांचे दोन कट्टर प्रतिस्पर्धी आमदारांचा सहभाग दिसून येत आहे. यातील एक आहेत उद्धव ठाकरेंचे उजवे प्रकाश सुर्वे तर दुसरे आहेत फडणवीस यांचे उजवे  प्रवीण दरेकर. मागाठाणे विधानसभेचे शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे एकीकडे शिंदेसोबतच्या बंडखोर आमदारांमध्ये सहभागी आहेत. शिवसेनेच्या 41 बंडखोर आमदारांमध्ये प्रकाश सुर्वे आहेत. त्यामुळे शिंदेंच्या नेतृत्त्वाखाली मविआ सरकार पडण्यात प्रकाश सुर्वे हातभार लावत आहेत.

- Advertisement -

तर दुसरीकडे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली शिंदे गटासोबत सत्ता स्थापनेसाठी नवी रणनिती आखली जात आहे. या रणनितीत दहिसर-बोरिवलीमधील आमदार प्रवीण दरेकरांचा सहभाग दिसून येत आहे. फडणवीसांच्या सागर बंगल्यावर सत्ता स्थापनेचे नवे डावपेच रचले जात आहे. फडणवीस दिल्लीतून ठरवेली रणनिती आपल्या काही मोजक्या विश्वासू सहकाऱ्यांना घेत सत्ता पाडण्यासाठी प्रयत्न करत आहे. फडणवीसांच्या या सहकाऱ्यांमध्ये नुकतेच विधान परिषदेत विजयी झालेले आमदार प्रवीण दरेकर यांचे नाव आहे. फडणवीसांच्या रणनितीवरील सक्रिय नेत्यांमध्ये प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी मंत्री गिरीश महाजन, आशिष शेलार, संजय कुटे, प्रसाद लाड यांच्यासह प्रवीण दरेकरांचाही तितकाच मोलाचा सहभाग आहे. फडणवीसांच्या यशस्वी राजकीय मोहिमांदरम्यान दरेकर त्यांच्यासोबत दिसून येतात. भाजपच्या विविध सरकारविरोधी आंदोलनातही दरेकरांचा सक्रिय सहभाग दिसून येतो.

त्यामुळे महाविकास आघाडी सत्ता पाडण्यासाठी शिंदेंच्या गटात प्रकाश सुर्वे आणि फडणवीसांच्या गटात प्रवीण दरेकर अशी दहिसरमधील हे दोन नेते सक्रिय आहे. मात्र प्रकाश सुर्वे शिंदेंच्या बंडखोर आमदाराच्या गोटात सहभागी झाल्याने बोरिवलीतील शिवसैनिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. प्रकाश सुर्वे यांच्या निषेधार्थ दहिसर, बोरिवली विभागातील शिवसेनेच्याच नगरसेवकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले. यावेळी प्रकाश सुर्वे यांच्या घरावर थेट नाराज शिवसैनिकांनी आपला मोर्चा नेला. तर दुसरीकडे त्याच विभागात विधान परिषदेत महाविकास आघाडीला पराभूत करत निवडून आल्याने आमदार प्रवीण दरेकरांनी मोठं शक्तीप्रदर्शन केलं.

- Advertisement -

मागाठाणे विधासभा मतदार संघात एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी म्हणून आमदार प्रकाश सुर्वे आणि भाजप आमदार प्रवीण दरेकर यांना ओळखले जाते. भाजपचे वजनदार नेते प्रवीण दरेकर अनेकदा शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे यांच्याविरोधात शड्डू ठोकना दिसले, यात प्रवीण दरेकर मागाठाणे मतदारसंघ आपल्या अमलाखाली आणण्यासाठी प्रयत्नशील असतात. तर स्थानिक आमदार प्रकाश सुर्वे यांनीही मतदारसंघावर मजबूत पकड ठेवली आहे. यामुळे विभागात नेहमी शिवसेना- भाजपविरुद्ध अशी लढाई लढणारे हे दोन आमदार आता महाविकास आघाडी सरकारची सत्ता पाडण्यासाठी समान भूमिकेवर प्रयत्न करताना दिसतायत. यातील दोन्ही नेत्यांची त्यांच्या पक्षातील आणि गटातील भूमिकाही सध्याच्या घडीला तितकीच महत्त्वाची आहे. 2014 साली मनसेच्या लाटेत प्रवीण दरेकर यांनी प्रकाश सुर्वे यांचा दणदणीत पराभव केला. मात्र हेच मंत्री आता शिंदे गटासोबत भाजपची सत्ता आल्यास मांडीला मांडी लागून बसताना दिसणार आहेत.

यात एकनाथ शिंदे गटाकडील आमदारांचा आकडा दिवसेंदिवस अपेक्षित आकड्यापेक्षा वाढत आहे. त्यामुळे शिवसेनेत उभी फूट पडल्याचं दिसून येत आहे. तसेच आघाडी सरकार अल्पमतात गेल्याचंही स्पष्ट झालं आहे. यामुळे शिंदे गट आता कायदेशीर बाबी पूर्ण करत भाजपसोबत सत्ता स्थापनेसाठी सज्ज झाला आहे.

नवीन सरकारचे गणित – राज्यात सध्या 287 एकूण आमदार आहेत. कोणत्याही पक्षाला सरकार स्थापन करण्यासाठी म्हणजेच बहुमतासाठी 144 आमदारांची गरज आहे. राज्यात भाजपकडे एकूण 113 आमदार आहेत. त्यामध्ये भाजपचे 106 आमदार आणि अपक्ष 7 आहेत. म्हणजे एकूण संख्याबळ 113 वर जाते. तर शिवसेनेचे संख्याबळ 55 वर आहे. यातील एका आमदाराचा मृत्यू झाल्याने सेनेचे संख्याबळ 54 वर आहे. यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या दावातील आमदारांचा समावेश केल्यास त्यातील एकूण 41 आमदार जोडले तर भाजप आणि शिंदे गटाची संख्या 154 वर जात आहे. पण नियमानुसार सत्तास्थापनेसाठी 145 आमदारांची गरज असते. त्यामुळे भाजप आणि शिंदे गटाची एकूण संख्या ही 154 वर जात आहे. अर्थातच भाजप हा अपक्ष आणि शिंदे गटातील आमदारांना बरोबर घेऊन सरकार स्थापन करु शकते.


शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनंतर फडणवीसही नॉटरिचेबल; ठरवतायत रणनीती

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -