घरक्रीडाइंग्लंडच्या 'हा' दिग्गद खेळाडू लवकरच घेणार निवृत्ती

इंग्लंडच्या ‘हा’ दिग्गद खेळाडू लवकरच घेणार निवृत्ती

Subscribe

इंग्लंडचा वनडे आणि टी-२० संघाचा कर्णधार इऑन मॉर्गन लवकरत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मागील अनेक सामन्यांमध्ये त्याची खेळी फ्लॉप ठरत आहे.

इंग्लंडचा (england) वनडे (ODI) आणि टी-२० संघाचा कर्णधार इऑन मॉर्गन (Eoin Morgan) लवकरत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून (international cricket) निवृत्ती घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मागील अनेक सामन्यांमध्ये त्याची खेळी फ्लॉप ठरत आहे. त्यामुळे मॉर्गन निवृत्तीचा निर्णय घेऊ शकतो अशी शक्यता इंग्रजी माध्यमांनी वर्तवली आहे. त्याशिवाय मॉर्गनने निवृती घोषित केल्यास जोस बटलर मर्यादित षटकांच्या संघाचा कर्णधार बनू शकतो. (england Eoin Morgan to retire from international cricket)

सततच्या खराब खेळीमुळे यंदाच्या आयपीएल लिलावात मॉर्गन याला कोणीही बोली लावली नव्हती. तसेच, नेदरलँड्स विरुद्धच्या वनडे मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये तो शून्य धावांवर बाद झाला होता. त्यानंतर दुखापतीमुळे तिसऱ्या वनडे सामन्याला तो खेळू शकला नाही.

- Advertisement -

हेही वाचा – इंग्लंडचा विश्वविक्रम, वनडे सामन्यात केल्या ४९८ धावा

मॉर्गनने गेल्या २८ आंतरराष्ट्रीय डावांमध्ये फक्त दोन अर्धशतके झळकावली आहेत. २०१५ च्या विश्वचषकात इंग्लंडच्या निराशाजनक कामगिरीनंतर अ‍ॅलिस्टर कुकच्या जागी मॉर्गनची वनडे संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली होती. इयॉन मॉर्गनने आपल्या कर्णधारपदाखाली इंग्लंड क्रिकेट संघाचे नशीब बदलले.

- Advertisement -

नेतृत्वाखाली २०१९ मध्ये इंग्लंड प्रथमच ५० षटकांचा विश्वचषक जिंकून दिला. २००६ मध्ये स्कॉटलंड विरुद्धच्या सामन्यात आयर्लंडकडून खेळताना त्याने एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. आयर्लंडकडून २२ वनडे सामने खेळल्यानंतर तो इंग्लंड क्रिकेट संघात सामील झाला.


हेही वाचा – रोहित शर्माच्या टी-२० कर्णधारपदाबाबत विरेंद्र सेहवागचं मोठं वक्तव्य

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -