घरमहाराष्ट्रभारनियमनाच्या वेळेत बदल करा

भारनियमनाच्या वेळेत बदल करा

Subscribe

सध्या या गावात अंधाराचा फायदा घेत चोर्‍याचे प्रमाण वाढले आहेत. तसेच अपघाताचे प्रमाण देखील वाढल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अहमदनगर तालुक्यातील निंबळक येथील गावकऱ्यांनी भारनियमाच्या वेळेत बदल करण्याची मागणी केली आहे.

अहमदनगर तालुक्यातील निंबळक येथे शेतीपंप आणि सिंगलफेज भारनियमच्या वेळेत बदल करण्याची मागणी करण्यात आली आहे. त्याचबरोबर शेती पंपाचे नवीन कोटेशन भरुन घेण्याची देखील मागणी निंबळक ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन महावितरणचे सहाय्यक अभियंता डी. ए. झांजे यांना देण्यात आले. तर सदर प्रश्न सोडविण्यासाठी उपकार्यकारी अभियंता के.बी.कोपनर यांच्याशी संपर्क साधण्यात आला.

या कारणांसाठी भारनियमनामध्ये बदल करावा

निंबळक, इसळक आणि खारेकर्जुने या तीन गावात शेती पंप आणि सिंगलफेजचे भारनियमन दुपारी ४.४० ते रात्री १०.४८ पर्यंत केले जात आहे. सध्या या गावात अंधाराचा फायदा घेत चोर्‍याचे प्रमाण वाढले आहे. तसेच रस्त्यावर अनेक लहान मोठे अपघात घडत आहे. या परिसरात एमआयडीसी येथे कार्यरत असणारे कामगार वर्ग असल्याने कंपनीतून काम संपल्यावर रात्री घरी येण्यासाठी कामगारांना अनेक अडचणी देखील येत आहे. तरी महावितरण विभागाने तातडीने दखल घेऊन पहाटे ४.४० ते सकाळी ८.४० तसेच दुपारी ४.४० ते सायंकाळी ६.४० असे भारनियमाच्या वेळापत्रकात बदल करावा. तसेच गावातील उपलब्ध पाण्याचा शेतीसाठी उपयोग होण्यासाठी शेती पंपाचे नवीन कोटेशन भरुन घेण्याची मागणी करण्यात आली आहे.

- Advertisement -

वाचा – परतीच्या पावसामुळे एक दिवसापुरते भारनियमन रद्द

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -