घरदेश-विदेशएकनाथ शिंदे गटाची आसामच्या पूरग्रस्तांना 51 लाखांची मदत, ट्विट करून दिली माहिती

एकनाथ शिंदे गटाची आसामच्या पूरग्रस्तांना 51 लाखांची मदत, ट्विट करून दिली माहिती

Subscribe

बंडखोर एकनाथ शिंदे आपल्या गटातील आमदारांसह आसामच्या गुहाटी येथे एका हॉटेलमध्ये वास्तव्यास आहेत. दरम्यान आसामच्या विविध भागात महापुराने थैमान घातले होते. महापुरामुळे जीवित आणि वित्त हानी मोठ्या प्रमाणात झाली होती. या पाश्वभूमीवर आसाम मधील पूरग्रस्तांना एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत मदत जाहीर केली आहे.

काय केली घोषणा –

- Advertisement -

या ट्विटमध्ये आसाम मधील पूरग्रस्त बांधवांच्या मदतीसाठी शिवसेनेचे सर्व आमदार तसेच सहयोगी आमदारांच्या वतीने आसाम मुख्यमंत्री मदत निधीत 51 लाख रुपयांची मदत करण्याचा निर्णय, घेतल्याचे एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहे.

काय आहे पुरस्थिती –
आसाममध्ये काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. देशाच्या ईशान्येकडील राज्यात पूर आणि भूस्खलनामुळे अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे. अनेक इमारतींचे नुकसान झाले आहे. माहितीनुसार, 21 लाखांहून अधिक लोक रामुळे बाधित झाले आहेत.
आसाममधील कछार आणि त्याच्या शेजारील करीमगंज आणि हैलाकांडी जिल्ह्यात पूरस्थिती गंभीर होती. आसाममधील 28 जिल्ह्यांमध्ये 21 लाखांहून अधिक लोकांना पुराचा फटका बसला आहे. कचार जिल्ह्यातील सिलचर शहरासारखे अनेक भाग पाण्याखाली होते. त्याचवेळी आसाममध्ये या वर्षी एप्रिलपासून पूर आणि भूस्खलनात 139 जणांचा मृत्यू झाला आहे.
Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -