घरलाईफस्टाईलVegan Diet म्हणजे काय ? बॉलिवूड सेलिब्रिटी सुद्धा करतात फॉलो

Vegan Diet म्हणजे काय ? बॉलिवूड सेलिब्रिटी सुद्धा करतात फॉलो

Subscribe

व्हेगन डाएट (vegan diet) हा प्रकार जगभरातील अनेक सेलिब्रेटी फॉलो करतात. व्हेगन डाएट (vegan diet) हा डाएटचा एक असा प्रकार आहे की वजन कमी करण्यासाठी आणि कमी केलेले वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रत्येक जण हे डाएट फॉलो करत आहे.

शाकाहारी आहार घेणे हा निरोगी राहण्याचा राहण्याचा मार्ग आहे. व्हेगन डाएट हा एक परिपूर्ण आहेत आहे जो शरीराला पोषक तत्वे, फायबर आणि जीवनसत्व प्रदान करतो. त्याचबरोबर शाकाहारी अन्न हे पचायला सोपे असते. त्यामुळे ते तुम्हाला दीर्घकाळ तंदुरुस्त ठेवते. आजकाल प्रत्येक जण स्वतःच्या प्रकृतीकडे आणि आहाराकडे विशेष लक्ष देत असतो. काही जण फिट राहण्यासाठी आहार आणि व्यायाम याकडे विशेष लक्ष देत असतो. वजन कमी करण्यापासून ते अगदी निरोगी राहण्यापर्यंत शाकाहारी आहार घेण्याचे अनेक फायदे आहेत. व्हेगन डाएट (vegan diet) हा प्रकार जगभरातील अनेक सेलिब्रिटी फॉलो करतात. व्हेगन डाएट (vegan diet) हा डाएटचा एक असा प्रकार आहे की वजन कमी करण्यासाठी आणि कमी केलेले वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रत्येक जण हे डाएट फॉलो करत आहे.

हे ही वाचा – Be careful : ‘फ्रुट शेक’ पिणे किती फायदेशीर? वाचा काय सांगतं ‘आयुर्वेद’

- Advertisement -

 

व्हेगन डाएट (vegan diet) हा निरोगी शरीरासाठी एक उत्तम पर्याय आहे. या डाएटमध्ये मांस, अंडी दुग्धजन्य पदार्थ किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या मांसाहाराचा समावेश होत नाही तर यामध्ये शाकाहारी अन्न पदार्थांचा समावेश होतो.

- Advertisement -

 

हे ही वाचा – चिंचेच्या पानांचा चहा कधी प्यायला आहे का ? ‘हे’ आहेत फायदे

व्हेगन डाएटचे (vegan diet) सेवन केल्या मुळे तुमचे वजन नियंत्रित राहू शकते तज्ज्ञांच्या मते वनस्पती आधारित आहार करून अनेक प्रकारचे आजार टाळले जाऊ शकतात. ज्यामध्ये कर्करोग, मधुमेह आणि हृदय विकाराच्या आजारांपासून तुम्ही दूर राहू शकाल.
व्हेगन डाएट (vegan diet) म्हणजे काय ते जाणून घेऊ.

 

हे ही वाचा –  पावसात भिजण्यापूर्वी केसांची काळजी घेण्यासाठी ‘या’ टिप्सचा नक्कीच उपयोग होईल

 

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, व्हेगन डाएट (vegan diet) म्हणजे शाकाहारी असणे, शाकाहारी आहार घेणे. या आहारामध्ये हिरव्या भाज्या, फळे आणि काजू यांचा प्रामुख्याने समावेश होतो. मांसाहारी आहारापेक्षा शाकाहारी आहार हा उत्तम असतो कारण तो पचायला हलका आणि उत्तम असतो. ज्याने तुमच्या पचनक्रियेवर ताण येणार आहे. मांसाहारी आहारामध्ये प्रोटीन जास्त प्रमाणात असतात तर फायबरचे प्रमाण कमी असते. शाकाहारी पदार्थांमध्ये भरपूर फायबर असते. ज्यामुळे तुमची पचनक्रिया सुधारते. शाकाहारी आहाराचं सेवन जर का तुम्ही केलं तर त्यामुळे तुमच्या शरीरामध्ये चरबी सुद्धा तयार होत नाही. ज्याने तुम्ही निरोगी राहता. त्याचबरोबर कोणत्याही प्रकारच्या समस्या भेडसावत नाहीत.

 

हे ही वाचा –  ‘कन्याकुमारीला’ वैशाली सामंतचा स्वरसाज, नवा म्युझिक अल्बम लवकरच रिलीज होणार

 

  • व्हेगन डाएटचे ३ प्रकार

संपूर्ण अन्न व्हेगन डाएट –

यामध्ये तुमच्या आहारात तुम्ही पूर्णपणे धान्य, फळे, नट, भाज्या आणि विविध प्रकारच्या बियांचा समावेश करू शकता.

 

रॉ फूड व्हेगन डाएट –

यामध्ये तुम्ही कच्च्या भाज्या आणि फळे यांचा समावेश करू शकता. ज्यामुळे त्या पदार्थांमध्ये असलेले पोषक घटक तुम्हाला पुरेपूर मिळतील.

 

हे ही वाचा – फडणवीसांनी दुय्यम पद स्वीकारले हे त्यांचा चेहराच सांगत होता – शरद पवार

 

स्टार्च सोल्युशन व्हेगन डाएट –

स्टार्च आहारामध्ये कमी चरबीयुक्त आणि जास्त प्रमाणात कार्बनयुक्त अन्नपदार्थ तुमच्या शरीरात जातात. ज्यामध्ये बटाटा, तांदूळ आणि कॉर्नचा वापर केला जातो.

 

व्हेगन डाएटचे फायदे –

व्हेगन डाएटचा आहार घेतला तर तुमचे नैराश्य दूर होते

शरीरात प्रोटीन आणि लोह जास्त प्रमाणात मिळते

तुम्हाला थकवा जाणवणार नाही

वजन कमी कारण्यासाठी हे डाएट फायदेशीर ठरते

या डाएटमुळे शरीराला कॅलरीज मिळतात पण शरीरात फॅट जमा होत नाहीत.

निरोगी आणि योय पद्धतीने वजन कमी कारण्यासाठी हे डाएट खूप फायदेशीर ठरते.

या संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही तज्ज्ञांचे सहाय्य घेऊ शकता. आणि त्यांच्या सल्ल्याने तुमच्या आहारात बदल करू शकता.

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -