घरताज्या घडामोडीअजितदादांचा स्वभाव रोखठोक आणि स्पष्ट - जयंत पाटील

अजितदादांचा स्वभाव रोखठोक आणि स्पष्ट – जयंत पाटील

Subscribe

शिंदे गट आणि भाजपने आज विधानसभेत बहुमताचा ठराव जिंकला. त्यामुळे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे विरोधी बाकावर बसले आहेत. त्यावर अजितदादांचा स्वभाव रोखठोक आणि स्पष्ट असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले.

अजितदादांचा स्वभाव रोखठोक आणि स्पष्ट

महाराष्ट्रातील विधानसभेची खुर्ची विरोधी पक्षाची खुर्ची हे महाराष्ट्रातल्या १२.५ कोटी जनतेला न्याय देण्यासाठी विरोधी पक्षनेते अजित पवार नक्की वापरतील, असा मला विश्वास आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना या सर्वांच्या वतीने महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते म्हणून केलेलं काम नक्कीच पुढील काळात राज्यातील जनतेला न्याय देणार ठरेल. दादांचं वर्णन मुखमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी केलेला आहे. दादांचा स्वभाव रोखठोक आणि स्पष्ट आहे, असं जयंत पाटील म्हणाले.

- Advertisement -

प्रत्येक खात्यातील बारकावे ओळखण्यात दादांना सुलभता येणार

अजित दादांचा स्वभाव रोखठोक असल्यामुळे मला खात्री आहे की, सभागृहातील ज्या गोष्टी चुकीच्या आणि बरोबर आहेत. त्यावर समंथपणाने बोट ठेवण्याचं काम दादा करतील. मी ३०-३५ वर्षातील विधीमंडळाचा त्यांचा अनुभव हा नक्कीच त्यांना उपयोगी पडेल, असा मला विश्वास आहे. आज दादा विरोधी पक्षनेते म्हणून जरी विराजमान झाले तरी या सभागृहातील उपमुख्यमंत्री पदही त्यांनी भुषवलं आहे. अनेक खात्याचा अनुभव त्यांना आहे. मागील अडीच वर्षात त्यांनी अर्थमंत्री म्हणून काम केलं आहे. प्रत्येक खात्यातील बारकावे ओळखण्यात दादांना अधिक सुलभता येणार आहे, असं पाटील म्हणाले.

सरकारच्या वतीने अनेक विषय जेव्हा मांडले जातील त्यावेळी अतिशय समर्थपणाने विरोधी पक्षाची बाजू ते मांडतील. त्यांच्या भाषणाची शैली आणि आक्रमकतेने बोलण्याची पद्धत तसेच आपल्या सभागृहात सरकारच्या बाजूने जे मुद्दे मांडतील. त्याला योग्य असं सहकार्य देखील अजित पवारांकडून मिळेल, असा मला विश्वास आहे.

- Advertisement -

विरोधी पक्षनेते म्हणून पवार नक्कीच सहकार्य करतील

मुख्यमंत्र्यांचं भाषण उत्तम होतं.त्यामुले ते आम्हाला भावलं. नगरविकास मंत्री म्हणून तुम्हाला कधीही न्याय मिळाला नाही. जो तुम्हाला आज भाषण करताना मिळाला. भाषण करण्याची संधी तुम्हाला मिळाली. तसेच तुम्ही आपलं मनोगत व्यक्त केलं. त्यामुळे मला खात्री आहे की, आपलं सरकार ज्या गोष्टी चांगलं करेल. त्याला विरोधी पक्षनेते म्हणून अजित पवार नक्कीच सहकार्य करतील. राज्यातील जनतेवर अनेक संकट येत असतात, त्यावेळी ते संकट दूर करण्यासाठी धावून जातील, असं पाटील म्हणाले.


हेही वाचा : एकनाथ शिंदेंकडे काय कला आहे देवाला माहीत, त्यांनी आमचाही एक आमदार फोडला – हितेंद्र ठाकूर


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -