घरदेश-विदेशपंतप्रधान मोदींच्या सुरक्षेचा भंग; आंध्र प्रदेशात काँग्रेसकडून काळे फुगे दाखवून विरोध

पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेचा भंग; आंध्र प्रदेशात काँग्रेसकडून काळे फुगे दाखवून विरोध

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आंध्रप्रदेश दौऱ्यातील सुरक्षेत मोठी चुक झाल्याची माहिती समोर आली आहे. विजयवाडा येथील गन्नावरम विमानतळावरून पंतप्रधानांच्या दोन हेलिकॉप्टरने उड्डाण केले. यावेळी विमानतळाजवळील बांधकामाधीन इमारतीच्या छतावरून काँग्रेस कार्यकर्त्यांकडून काळे फुगे सोडून पंतप्रधानांना विरोध दर्शवण्यात आला, या घटनेचा एका व्हिडिओ आता समोर येत आहे.

या प्रकरणी पोलिसांनी 3 आरोपींना अटक केली आहे, यावेळी काही लोकांनी फुग्यांसोबत पोस्टरही बांधले होते. भाजपला विरोध दर्शवण्यासाठी काँग्रेसकडून हे काळे फुगे सोडण्यात आल्याचे म्हटले जातेय. दरम्यान हे काँग्रेस कार्यकर्ते पंतप्रधानांच्या हेलिकॉप्टरजवळ येणार असल्याची माहिती सुरक्षा अधिकाऱ्यांना देखील नव्हती. यावर एसपी सिद्धार्थ कुशल म्हणाले की, विमानतळाजवळ कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. पंतप्रधानांच्या हेलिकॉप्टरने उड्डाण करताच या लोकांनी फुगे हवेत सोडले.

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वातंत्र्यसैनिक अल्लुरी सीताराम राजू यांच्या १२५ व्या जयंती सोहळ्यात सहभागी होण्यासाठी सोमवारी आंध्र प्रदेशात पोहोचले होते. यावेळी त्यांच्या हस्ते राजू यांच्या 30 फूट उंच कांस्य पुतळ्याचे अनावरणही करण्यात आले. दरम्यान पंतप्रधान मोदींच्या हेलिकॉप्टरने आंध्रप्रदेशातील विजयवाडा येथून उड्डाण केले. यावेळी हेलिकॉप्टरने उड्डाण घेताच काही लोकांनी फुगे सोडले जात असल्याचे व्हायरल व्हिडीओमध्ये दिसतेय. या प्रकरणी आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्याकडूनही कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

यापूर्वी देखील पंजाब विधानसभा निवडणुकीदरम्यान पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेत मोठी चूक झाल्याची घटना घडली होती. पठाणकोट रॅलीसाठी जाताना मोठ्या संख्येने शेतकरी आंदोलनातील आंदोलकांनी त्यांचा ताफा अडवला होता, मात्र अचानक आंदोलकांनी रस्त्यावर उतरून मोदींचा ताफा अडवला होता, यामुळे जवळपास अर्ध्या तास मोठी रस्त्यावर अडकून पडले होते, या घटनेनंतर केंद्राने पंजाब सरकारकडून उत्तर मागितले होते. त्यावेळी पंजाबमधील तत्कालीन काँग्रेस सरकारने खंत व्यक्त केली, ज्यावरून देशातील राजकारण खवळून निघाले होते.


खरी शिवसेना आम्हीच, लोकशाहीत संख्याबळाला महत्त्व, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -