घरदेश-विदेशदेशात 30 महिन्यांनंतर तांबं झालं सर्वात स्वस्त; लोखंड- स्टीलचे दरही कमी

देशात 30 महिन्यांनंतर तांबं झालं सर्वात स्वस्त; लोखंड- स्टीलचे दरही कमी

Subscribe

ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, जून तिमाहीत तांब्याच्या किमतीत मोठी घसरण झाली. 2008 च्या आर्थिक संकटानंतर कोणत्याही तिमाहीत तांब्याच्या किमतीत झालेली ही सर्वात मोठी घसरण होती

जगभरात धातूंच्या किमती सातत्याने कमी होत आहेत. यापूर्वी लोखंड आणि स्टीलच्या किमतीत घसरण होत होती आणि आता तांब्याच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. जगभरात वाढते व्याजदर, चीनमधील वाढते कोरोना रुग्ण, मंदीची भीती आणि वाढत्या इन्व्हेंटरीमुळे जागतिक बाजारपेठेत तांब्याच्या किमती नोव्हेंबर 2020 नंतर नीचांकी पातळीवर आल्या आहेत.

न्यूयॉर्कमध्ये 19 महिन्यांत सर्वात कमी किंमत

न्यूयॉर्कच्या कॉमेक्स मार्केटमध्ये सप्टेंबरमध्ये डिलिव्हरीसाठीच्या तांब्याची किंमत मंगळवारी 4.8 टक्क्यांनी घसरली. मंगळवारच्या व्यापारादरम्यान ही किंमत $3.43 एक पौंड म्हणजे 7,546 डॉलर प्रति टन इतकी घसरली. नोव्हेंबर 2020 नंतर तांब्याच्या दराची ही नीचांकी पातळी आहे. त्याचप्रमाणे शांघायमध्ये ऑगस्ट करारासाठीचे तांबे 1.9 टक्क्यांनी घसरून 60,110 युआन प्रति टन म्हणजे 8,975.66 डॉलर प्रति टन झाला आहे.

- Advertisement -

या कारणांमुळे तांब्याच्या दरात घसरण

माइनिंग डॉट कॉमने दिलेल्या अहवालानुसार, सिंगापूरस्थित बेस्ड मेटल ट्रेडरच्या हवाल्याने सांगितले की, मंदीच्या भीतीमुळे सेंटिमेंट वर प्रभाव दिसून येत आहे. अमेरिकेसह अनेक देशांतील महागाईचा दर उच्च पातळीवर पोहचला आहे, त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी आता व्याजदर वाढवले ​​जात आहेत. फेडरल रिझर्व्हने या महिन्यात व्याजदर पुन्हा 0.75 टक्क्यांनी वाढवला. तर दुसरीकडे लंडन मेटल एक्सचेंजने मंजूर केलेल्या गोदामांमधील तांब्याचा साठा एका आठवड्यात 20 टक्क्यांहून अधिक वाढून 1,36,950 टन झाला आहे. या सर्व बाबींचा तांब्याच्या किमतीवर परिणाम होत आहे.

तांब्याशिवाय इतर धातूंचे भावही घसरले

ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, जून तिमाहीत तांब्याच्या किमतीत मोठी घसरण झाली. 2008 च्या आर्थिक संकटानंतर कोणत्याही तिमाहीत तांब्याच्या किमतीत झालेली ही सर्वात मोठी घसरण होती. लंडन मेटल एक्सचेंजमध्येही तांब्याच्या किमतीत मोठी घसरण झाली. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, लंडन मेटल एक्सचेंजवर तांब्याची किंमत 5.1 टक्क्यांनी घसरून 7,597 डॉलर प्रति टन झाली, जी डिसेंबर 2020 नंतरची सर्वात कमी पातळी आहे. निकेल, जस्त, सोने, चांदी या धातूंच्या किमतीही काही काळापासून घसरण होत आहे.


राज्यात दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा; राष्ट्रीय, राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या १५ तुकड्या तैनात


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -