घरताज्या घडामोडी'त्या' घटनेप्रकरणी राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

‘त्या’ घटनेप्रकरणी राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

Subscribe

कोकणात अतिवृष्टी झाल्याने अनेकांना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागला होता. याशिवाय, तीन जणांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी आता चिपळूण पोलिस स्थानकात संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गतवर्षी मुसळधार पावसाचा कोकणाला मोठा फटका बसला होता. कोकणात अतिवृष्टी झाल्याने अनेकांना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागला होता. याशिवाय, तीन जणांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी आता चिपळूण पोलिस स्थानकात संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानुसार, मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम करणाऱ्या कल्याण टोलवेज इन्फ्रट्रक्चर कंपनीच्या संचालकासह राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांवर निष्काळजीपणाचा ठपका ठेवला आहे. या प्रकरणी कंपनीच्या अधिकाऱ्यांसह राष्ट्रीय महामार्गाचे कार्यकारी अधिकारी आणि शाखा अभियंता अशा ९ जणांवर चिपळूण पोलिस स्थानकात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (ratnagiri chilun rain updates 9 officers charged with culpable homicide)

मुसळधार पाऊस पडल्यास राज्यात अनेक ठिकाणी दरड कोसळण्याच्या दुर्घटना घडतात. या दुर्घटनांमध्ये अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागतो. अशीच एक घटना गतवर्षी घडली होती. कोकणात अतिवृष्टी झाली होती. या अतिवृष्टीने गावच्या गावं पाण्याखाली गेली होती. तसेच, चिपळूणमधील पेढे – कुंभारवाडी परशुराम गावात गतवर्षी अतिवृष्टीत दरड कोसळून तिघांचा मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली होती. गतवर्षी २२ जुलै रोजी अतिवृष्टीमुळे चिपळूणला महापुराचा फटका बसला होता.

- Advertisement -

नेमकी घटना काय?

अतिमुसळधार पावसामुळे तालुक्यातील परशुराम घाटाखालील पेढे कुंभारवाडी येथील घरावर दरड खाली पडली. दरड पडल्याने तिघांचा मृत्यू झाला होता. मुंबई गोवा महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम गेले काही वर्षे सुरु आहे. यामध्ये चिपळूण नजीकचा परशुराम घाटाचे काम चौपदरीकरणाचे काम सुरु झाले. या अर्धवट कामाचा फटका घाटा खाली असलेल्या घरांना बसला. अर्धवट स्थितीत असलेल्या कामामुळे घाटातील दरड पेढे – कुंभारवाडी येथील घरांवर खाली आली आणि घरे क्षणांतच जमीनदोस्त झाली. त्यानंतर गावकऱ्यांनी प्रशासनाकडे वारंवार मागणीही केली होती.

- Advertisement -

याशिवाय, कंपनी आणि ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी करत त्यासाठी गावकरी उपोषणालाही बसले. त्यानंतर गावकऱ्यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे ॲड. ओवेस पेचकर यांच्याकडे जाऊन दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा यासाठी धडपड सुरु केली. त्यानंतर ॲड. पेचकर यांनी अशा स्वरुपातील गुन्हा दाखल करण्यासाठीचा मागणी अर्ज चिपळूण न्याय दंडाधिकारी यांच्याकडे देत न्यायालयीन लढा सुरु ठेवला.


हेही वाचा – सर्वोच्च न्यायालय कुणाच्याही खिशात नाही, संजय राऊतांची शिंदे गटावर टीका

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -