घरनवी मुंबईपनवेलजवळ ३६२.५९ कोटींचे हेरॉईन हस्तगत

पनवेलजवळ ३६२.५९ कोटींचे हेरॉईन हस्तगत

Subscribe

राज्यातील आतापर्यंतचा सर्वांत मोठा साठा

महाराष्ट्रासह रायगड जिल्ह्याला हादरवून टाकणारा प्रकार शुक्रवारी पनवेलमध्ये उघडकीस आला. पनवेलजवळील अजिवली हद्दीत नवकार लॉजिस्टिकमधून परदेशातून अवैधरित्या आयात केलेले ३६२.५९ कोटी रुपयांचे हेरॉईन नामक अमली पदार्थ हस्तगत करण्यात आले. हा राज्यातील आतापर्यंतचा सर्वांत मोठा साठा असल्याचे समजते.

गुन्हे शाखा, नवी मुंबई येथे पंजाब पोलिसांचे स्पेशल ऑपरेशन सेलकडून पोलीस आयुक्तालय हद्दीतील न्हावाशेवा पोर्ट, नवी मुंबई येथे दुबई येथून कंटेनरमध्ये अमली पदार्थ लपवून भारतात आणल्याची व सदरच्या कंटेनरमधील माल घेण्यासाठी अद्यापही कोणी आले नसल्याची माहिती पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा यांना मिळाली होती. या माहितीची पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंह यांनी गंभीर दखल घेऊन पोलीस उपायुक्त सुरेश मेंगडे यांच्या नेतृत्वाखाली व अपर पोलीस आयुक्त महेश घुर्ये यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, नवी मुंबईच्या पोलीस पथकाने सदर कंटेनरचा शोध घेतला.

- Advertisement -

यावेळी हा कंटेनर दुबई येथून न्हावाशेवा पोर्ट येथे आयात केल्याचे व कंटेनर नवकार लॉजिस्टिक, सर्व्हे नं. १३७/१९/१, नवीन आजिवली गाव, जुना मुंबई-पुणे महामार्ग पनवेल येथे उतरविण्यात आल्याची माहिती मिळाली. कंटेनरमधील आयात केलेल्या मार्बल्स घेऊन जाण्यास कोणीही दावा न केल्याने संशय आल्याने कंटेनरची पंचांसमक्ष पाहणी करण्यात आली.

यावेळी मार्बल्स काढल्यानंतर कंटेनरच्या दरवाजाला असलेल्या फ्रेमची पाहणी केली असता ३६२.५९ कोटी रुपयांचे १६८ पॅकेट्स मिळून आले. याबाबत पनवेल तालुका पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास गुन्हे शाखा करीत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -