घरमहाराष्ट्रपुणेकोल्हापूरच्या दोन्ही खासदारांनी पक्षाला धोका दिला, संजय पवारांचा आरोप

कोल्हापूरच्या दोन्ही खासदारांनी पक्षाला धोका दिला, संजय पवारांचा आरोप

Subscribe

एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर गेलेल्या आमदारांना गेले ते बेन्टेक्स आणि राहीले ते सोने अने खासदार मंडलिक यांनी संबोधले होते. मात्र, आता खासदार संजय मंडलिक एकनाथ शिंदे गटात डेरेदाखल झाले. यानंतर बंडखोर खासदारांविषयी बोलताना शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांना अश्रू अनावर झाले. यावेळी उद्धव ठाकरेंनी ज्यांच्यावर विश्वास टाकला त्यांनीच विश्वासघात केला. उद्धवसाहेबांनी आता गद्दारांवर विश्वास टाकू नये. कोल्हापूरच्या दोन्ही खासदारांनी धोका दिलाय, अशा शब्दात त्यांना आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले.

राजीनामा देऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरावे –

- Advertisement -

शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांनी बंडखोरी करत शिंदे गटात प्रवेश केला. यानंतर कोल्हापुरातील शिवसैनिकांच्यात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. दोन्ही खासदारांचे कार्यकर्ते वगळता शिवसैनिक खासदारांनी घेतलेल्या निर्णयाविरोधात आक्रमक झाले आहेत. यानंतर संजय पवार यांना शिवसेनेची आताची परस्थिती बघून अश्रू अनावर झाले. त्यांनी बंडखोरांमध्ये हिम्मत असेल तर त्यांनी याक्षणी राजीनामा देऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरावे. त्यांना कोल्हापूरचे शिवसैनिक जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही, असे आव्हान खासदार मंडलिक आमि मानेंना केले.

गद्दारांवर विश्वास टाकू नये-

- Advertisement -

मला धैर्यशील मानेंविषयी काही बोलयाचे नाही. कारण त्यांच्या प्रवास राष्ट्रवादी, शिवसेना असा राहिला आहे. पक्षाशी एकनिष्ठ न राहण्याचा त्यांचा इतिहास आहे. मात्र, मला वाईट वाटते की जे आमच्याबरोबर बैठकीला उपस्थित राहून गद्दारांना धडा शिवण्याचे प्लॉनिंग करत होते, तेच मंडलिक आज बंडखोर गटाला जाऊन मिळाले. उद्धव ठाकरेंनी ज्यांच्यावर विश्वास टाकला त्यांनीच धोका दिला. आता उद्धव ठाकरेंनी गद्दारांवर विश्वास टाकू नये. परत पक्षात त्यांना स्थान देऊ नये. ठाकरे कुटुंब आणि अवघी शिवसेना संकटात असताना मंडलिक असे वागूच कसे शकतात? अशा भावना संजय पवार यांनी व्यक्त केल्या

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -