घरक्रीडाअब्दुल्ला शफीकची शतकी खेळी; पाकिस्तानचा श्रीलंकेवर ऐतिहासिक विजय

अब्दुल्ला शफीकची शतकी खेळी; पाकिस्तानचा श्रीलंकेवर ऐतिहासिक विजय

Subscribe

श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्या सुरू असलेल्या दोन सामन्यांच्या मलिकेमध्ये पाकिस्तानच्या संघाने इतिहास रचला आहे. श्रीलंकेने ३४२ धावांचे लक्ष्य पाकिस्तानला दिले होते. हे लक्ष्य ४ गडी राखून यशस्वीपणे गाठले.

श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्या सुरू असलेल्या दोन सामन्यांच्या मलिकेमध्ये पाकिस्तानच्या संघाने इतिहास रचला आहे. श्रीलंकेने ३४२ धावांचे लक्ष्य पाकिस्तानला दिले होते. हे लक्ष्य ४ गडी राखून यशस्वीपणे गाठले. पाकिस्तानच्या या विजयात युवा फलंदाज अब्दुल्ला शफीक याची खेळी महत्वाची ठरली. अब्दुल्ला शफीकने १६० धावांची नाबाद खेळी केली. यासह पाकिस्तानने दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. (pakistan create history by beating sri lanka in first test abdullah shafique)

श्रीलंकेने दिलेल्या ३४२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानची चांगली सुरुवात झाली. अब्दुल्ला शफीक आणि इमाम-उल-हक या जोडीने पहिल्या विकेटसाठी ८७ धावांची भागीदारी केली. मात्र, १०४ धावांच्या स्कोअरवर अझहर अली बाद झाला. अझहर अलीच्या विकेटनंतर श्रीलंकेने सामन्यात पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. मात्र बाबर आझम आणि अब्दुल्ला शफीक यांनी आघाडी घेतली.

- Advertisement -

अब्दुल्ला शफीकने तुफान फलंदाजी करत कसोटी कारकिर्दीतील दुसरे शतक झळकावले. बाबर आझमनेही ५५ धावांची खेळी केली. या दोघांच्या खेळीमुळे पाकिस्तानला सामना जिंकण्याच्या मार्ग मोकळा झाला.

अब्दुल्ला शफीकने १६० धावांची नाबाद खेळी खेळली. बाबर बाद झाल्यानंतर रिझवानने शफीकने पाकिस्तानच्या संघाचा डाव सावरला. रिझवानने ४० धावांची खेळी करत पाकिस्तानला ६ विकेटने विजय मिळवून दिला.

- Advertisement -

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने पहिल्या डावात २२२ धावा केल्या होत्या. पाकिस्तानच्या फलंदाजांनाही पहिल्या डावात चांगली कामगिरी करता आली नाही. त्यामुळे संपूर्ण संघ २१८ धावा करून सर्वबाद झाला. श्रीलंकेने मात्र दुसऱ्या डावात चांगली कामगिरी करत पाकिस्तानसमोर ३४२ धावांचे अवघड आव्हान ठेवले होते. मात्र पाकिस्तानी संघाने गॉलच्या मैदानावर चौथ्या डावात सर्वात मोठे लक्ष्य गाठून इतिहास रचला.


हेही वाचा – भारताची स्टार धावपटू धनलक्ष्मीची डोप चाचणी पॉझिटिव्ह

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -