घरताज्या घडामोडीतुळशी, भातसासह चार तलावांत प्रत्येकी २ हजार मिमीपेक्षाही जास्त पाऊस

तुळशी, भातसासह चार तलावांत प्रत्येकी २ हजार मिमीपेक्षाही जास्त पाऊस

Subscribe

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांमध्ये सध्या १२ लाख ८९ हजार ४३५ दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा जमा झाला आहे.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांमध्ये सध्या १२ लाख ८९ हजार ४३५ दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा जमा झाला आहे. विशेष म्हणजे या सात तलावांपैकी सर्वात कमी पाणी साठवण क्षमता असलेल्या तुळशी तलावांत, सर्वात जास्त पाणीसाठवण क्षमता असलेल्या भातसा तलावात, मोडक सागर व तानसा तलावांत अनुक्रमे २७३५.०० मिमी, २,१३९.०० मिमी, २०७१ मिमी आणि २००७ मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. (More than 2000 mm rain each in four lakes including Tulsi Bhatsa)

या सात पैकी या तीन तलावांत सर्वात जास्त पाऊस पडल्याने तुळशी – ८,०४६ दशलक्ष लि. भातसा तलावात ६,१८,९५१ दशलक्ष लि. तर मोडक सागर तलावांत १,२८,९२५ दशलक्ष लि. तर तानसा तलावांत – १,४४,३५८ दशलक्ष लि. इतका पाणीसाठा जमा झाला आहे. सात तलावातील एकूण पाणीसाठा १२ लाख ८९ हजार ४३५ दशलक्ष लिटर इतका असून त्या तुलनेत वरील चार तलावांत मिळून ९ लाख २८० दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा जमा झाला आहे.

- Advertisement -

पुढील २३ जूनपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांत गेल्या जून महिन्यात अल्पसा पाऊस पडला होता . मात्र जुलै महिन्याच्या प्रारंभापासून ते २४ जुलै या कालावधीत तलावांत चांगला मुसळधार पाऊस पडला. त्यामुळे तलावांत १२ लाख ८९ हजार ४३५ दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा जमा झाला आहे.

- Advertisement -

मुंबईला दररोज ३ हजार ८५० दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा केला जातो. मुंबईला पावसाळा संपल्यापासून पुढील वर्षभरासाठी सात तलावांत मिळून १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर इतक्या पाणीसाठयाची आवश्यकता असते. त्या तुलनेत गेल्या पावणे दोन महिन्यात सात तलावांत १२ लाख ८९ हजार ४३५ दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा जमा झाला आहे. अद्यापही पावसाळ्याचे सवादोन महिने बाकी आहेत. त्यामुळे सध्या जमा पाणीसाठा हा पुढील ३३३ दिवस पुरेल इतका म्हणजे पुढील ११ महिन्यांचा म्हणजेच पुढील २३ जून २०२३ पर्यन्त पुरेल इतका आहे.

आतापर्यंत तीन तलाव ‘ओव्हर फ्लो’

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांपैकी मोडक सागर तलाव १३ जुलै रोजी दुपारी १.०४ वाजता ओसंडून वाहू लागला होता. त्यानंतर तानसा तलावही १४ जुलै रोजी रात्री ८.५० वाजता भरून वाहू लागला. तर १६ जुलै रोजी सायंकाळी ५.४५ वाजताच्या सुमारास तुळशी तलावही भरून वाहू लागला.

सात तलावातील दैनंदिन व एकूण पाऊस

तलाव           दैनंदिन पाऊस मिमी             एकूण पाऊस मिमी

उच्च वैतरणा         २९.००                            १,४१७.००

मोडकसागर         ६०.००                            २,०७१.००

तानसा               ७६.००                            २,००७.००

मध्य वैतरणा        ५१.००                             १,८९७.००

भातसा              ८८.००                             २,१३९.००

विहार               ३३.००                             १,८६६.००

तुळशी              २५.००                             २,७३५.००

 


हेही वाचा – पंकजा मुंडेंच्या कार्यकर्त्यांची नाराजी स्पष्ट; वाढदिवसाच्या बॅनरवरूर भाजप नेत्यांचे फोटो गायब

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -