घरट्रेंडिंगअकरावी ऑनलाईन प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर, ३ ऑगस्टला पहिली गुणवत्ता यादी

अकरावी ऑनलाईन प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर, ३ ऑगस्टला पहिली गुणवत्ता यादी

Subscribe

दहावी परिक्षा उतीर्ण होऊन अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे. अकरावी ऑनलाईन प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर झाले आहे.

दहावी परिक्षा उतीर्ण होऊन अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे. अकरावी ऑनलाईन प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. २५ जुलै पासून पहिल्या प्रवेश फेरीला सुररवात होणार आहे. तसेच, ३ ऑगस्ट रोजी पहिली गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार आहे. (11th online admission schedule announced first admission round will start from 25th july and first merit list on 3rd august)

ऑनलाईन अकरावी प्रवेश फेऱ्यांचे वेळापत्रक

- Advertisement -
  • २५ जुलै रोजी सकाळी १० वाजल्यापासून ते २७ जुलै रात्री १० वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी महाविद्यालयाचे पसंती क्रमांक नोंदवयाचा आहे.
  • नियमित प्रवेश फेरी एक साठी पसंती अर्ज भाग-२ ऑनलाईन सादर करायचा आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना १ ते १० कॉलेजचा पसंतीक्रम देता येणार आहे.
  • विद्यार्थ्यांनी दिलेल्या मुदतीमध्ये अर्धाचा भाग २ लॉक करायचा आहे.
  • विद्यार्थ्यांच्या डेटा प्रोसेसिंग नंतर गुणवत्तेनुसार आणि दिलेल्या पसंतीनुसार कॉलेज पहिल्या फेरीमध्ये मिळणार आहे.
  • नवीन विद्यार्थी या ऑनलाईन ११ वी प्रवेश प्रक्रियेमध्ये सहभागी होणार आहेत, त्यांना अर्जाचा भाग एक आणि भाग दोन भरता येईल.
  • २८ जुलै सकाळी १० पासून ते ३० जुलै संध्याकाळी ६ वाजेपर्यंत तात्पुरत्या सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार आहे.
  • सर्वसाधारण गुणवत्ता यादीत दुरुस्ती असल्यास तर ऑनलाईन हरकती विद्यार्थ्यांनी सादर कराव्यात.
  • या सगळ्या दुरुस्त झाल्यानंतर सर्वसाधारण गुणवत्ता यादी अंतिम केली जाणार आहे.
  • ३ ऑगस्ट सकाळी १० वाजता प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर होईल.
  • यामध्ये पहिल्या फेरीचे कट ऑफ पोर्टलवर दर्शविले जातील.
  • ३ ऑगस्ट सकाळी १० ते ६ ऑगस्ट संध्याकाळी ६ वाजेपर्यंत पहिल्या फेरीमध्ये मिळालेल्या कॉलेजमध्ये प्रवेश निश्चित करता येईल.
  • मिळालेल्या महाविद्यालयात प्रवेश घ्यावयाचा असल्यास प्रवेशाची औपचारिकता या काळात विद्यार्थ्यांनी पूर्ण करावी आणि आपला प्रवेश निश्चित करावा.
  • जर विद्यार्थ्यांना पहिल्या फेरीमध्ये मिळालेल्या कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा असेल त्यांनी प्रोसीड फॉर अॅडमिशनवर क्लिक करून आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी आणि महाविद्यालयात प्रवेश निश्चित करावा.
  • जर विद्यार्थ्यांना पहिल्या फेरीमध्ये मिळालेल्या कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा नसेल तर तो विद्यार्थी पुढील फेरीसाठी थांबू शकतो.
  • मात्र पसंती क्रमांक एक नंबरला असलेले कॉलेज विद्यार्थ्याला पहिल्या फेरीत मिळाले असेल तर त्याला त्या ठिकाणी प्रवेश घेणे अनिवार्य असेल अन्यथा त्याला एक प्रवेश फेरी प्रतिबंधित केली जाईल.
  • जर एखाद्या विद्यार्थ्याने प्रवेश निश्चित करून त्यानंतर रद्द करायचा असेल तरीसुद्धा त्या विद्यार्थ्याला एका फेरीसाठी प्रतिबंधित केले जाईल.
  • ७ ऑगस्ट अकरावी प्रवेशाच्या दुसऱ्या फेरीसाठी रिक्त जागा जारी केल्या जातील व त्यानंतर दुसरी फेरी आयोजित केली जाईल.

निकाल १७ जुलैला जाहीर

राज्य मंडळाचा निकाल १७ जुलैला जाहीर झाला. मात्र महिना होऊन सुद्धा इतर बोर्डाच्या दहावीच्या निकालासाठी ११ वी प्रवेश प्रक्रिया रखडली होती त्यामुळे आता इतर बोर्डाचे निकाल जाहीर झाल्यानंतर अकरावी प्रवेशाची पहिली फेरी सुरू होत आहे.

- Advertisement -

हेही वाचा – मतदार ओळखपत्रांशी आधारकार्ड होणार लिंक; १ ऑगस्टपासून महाराष्ट्रातून मोहिमेला सुरुवात

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -