घरमुंबईएक चूक पडू शकते महागात; एअरपोर्टजवळील उंच इमारतींबाबत हायकोर्टाची टिप्पणी

एक चूक पडू शकते महागात; एअरपोर्टजवळील उंच इमारतींबाबत हायकोर्टाची टिप्पणी

Subscribe

मुंबई हायकोर्टाने आज एअरपोर्टजवळील उंच इमारतींबाबत महत्त्वपूर्ण टिप्पण्णी केली आहे. फ्लाइट्मधील सर्व काही हवाई वाहतूक नियंत्रणावर अवलंबून असते. त्यामुळे एका चुकीमुळे काहीही घडू शकते, अशा शब्दात हायकोर्टाने
एअरपोर्टजवळील उंच इमारतींबाबत चिंता व्यक्त केली आहे. सोमवारी मुंबई एअरपोर्टजवळील उंच इमारतींमुळे विमान उड्डाणास निर्माण होणाऱ्या धोक्याबाबतच्या याचिकेवर सुनावणी करताना हायकोर्टाने ही टिप्पणी केली आहे.
सरन्यायाधीश दीपंकर दत्ता आणि न्यायमूर्ती एमएस कर्णिक यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडली.

वकील यशवंत शेणॉय यांनी ही जनहित याचिका दाखल केली होती. या याचिकेत मुंबई एअरपोर्ट परिसरात ठराविक मर्यादीत उंचीपेक्षा जास्त उंचीच्या इमारतींच्या बांधकामावर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. शेनॉय यांच्या म्हणण्यानुसार, या इमारतींमुळे मुंबई एअरपोर्टवर विमानांचे टेक ऑफ आणि लँडिंग होण्यास धोका निर्माण होत आहे, ज्यामुळे कोणत्याही क्षणी काहीतरी अअनुचित घटना घडू शकते.

- Advertisement -

सरन्यायाधीशांनी केला ‘रनवे 34’ चित्रपटाचा उल्लेख

एका वृत्तसंस्थेच्यामाहितीनुसार, या प्रकरणावर सुनावणी करताना सरन्यायाधीश दीपंकर दत्ता म्हणाले की, हा मुद्दा प्रत्येकाशी संबंधित आहे. यावेळी न्यायाधीशांनी अलीकडेच रिलीज झालेल्या अजय देवगण स्टारर हिंदी चित्रपट ‘रनवे 34’ चित्रपटाचाही संदर्भ दिलाय

यावर सरन्यायाधीश दत्ता म्हणाले की, मी ‘रनवे 34’ हा चित्रपट पाहिला आहे. विमान पायलटवर काहाही अवलंबून नसते. सर्व काही हवाई वाहतूक नियंत्रणावर अवलंबून असते. मात्र आपल्याला वाटते की, पायलटने घोषित केली की, आम्ही लँडिंग किंवा टेक ऑफसाठी तयार आहोत आणि बाहेरचे तापमान असे आहे आणि सर्व काही ठीक आहे. परंतु हे सर्व इतर अनेक घटकांवरही अवलंबून असते. त्यामुळे बाहेरील परिस्थिती आणि विमानातील आतील स्थिती यात जर एकही चूक झाली तर महागात पडू शकते. कोणत्याही स्थितीत काहीही घडू शकते.

- Advertisement -

खंडपीठाने महाराष्ट्र सरकार आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेला या मुद्द्यावर केलेल्या कारवाईबाबत प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश दिले. त्यावर पुढील सुनावणी शुक्रवारी होणार असल्याचे न्यायालयाने सांगितले.


हेही वाचा : भारताच्या ‘या’ बूस्टर डोसमुळे चीनची घाबरगुंडी, सीमेवर उडवले लढाऊ विमान


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -