घरमनोरंजन'राष्ट्र' चित्रपट जागृत करणार देशभक्ती; कलाकारांसह राजकीय नेतेही साकारणार चित्रपट भूमिका

‘राष्ट्र’ चित्रपट जागृत करणार देशभक्ती; कलाकारांसह राजकीय नेतेही साकारणार चित्रपट भूमिका

Subscribe

'राष्ट्र - एक रणभूमी'(rashtra - eki ranbhumi) हा असाच एक आगामी मराठी चित्रपट आहे, ज्यानं आपल्या वैविध्यपूर्ण वैशिष्ट्यांच्या बळावर सर्वांचंच लक्ष वेधून घेण्यात यश मिळवलं आहे.

मराठी चित्रपट सृष्टीत नेहमीच वेगवेगळ्या आशयाचे चित्रपट प्रदर्शित हो असतात. त्याचबरोबर देशभक्तीवर आधारीत चित्रपट सुद्धा येत आहेत. अशातच ‘राष्ट्र – एक रणभूमी’ हा चित्रपट सुद्धा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  प्रत्येक चित्रपट कोणत्या ना कोणत्या कारणामुळं चर्चेत राहतो आणि सर्वांचं लक्ष वेधून घेतो, पण काही चित्रपट मात्र एक ना अनेक कारणांमुळे आकर्षणाचं केंद्र ठरतात. ‘राष्ट्र – एक रणभूमी'(rashtra – eki ranbhumi) हा असाच एक आगामी मराठी चित्रपट आहे, ज्यानं आपल्या वैविध्यपूर्ण वैशिष्ट्यांच्या बळावर सर्वांचंच लक्ष वेधून घेण्यात यश मिळवलं आहे. महामारीमुळे लांबणीवर गेलेला महत्त्वपूर्ण विषयावर आधारित असलेला हा चित्रपट आता प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे.  ‘राष्ट्र’ हा चित्रपट २६ ऑगस्टच्या मुहूर्तावर म्हणजेच यंदा स्वातंत्र्यदिना नंतर प्रेकक्षकांच्या भेटीला येणार आहे.

हे हा वाचा – समंथाने खरेदी केलं हैदराबादमधील नागा चैतन्यचं घर

- Advertisement -

निर्माते बंटी सिंग यांनी इंदर इंटरनॅशनल या बॅनरखाली ‘राष्ट्र’ चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटाचं लेखन, दिग्दर्शन आणि संकलन इंदरपाल सिंग यांनी केलं आहे. वर्तमान काळातील राजकीय पटलावर सादर होणाऱ्या या चित्रपटात देशभक्तीची भावना जागृत करणारं कथानक पहायला मिळणार असल्याची ‘राष्ट्र’ या टायटलवरूनच सहज कल्पना येते. महाराष्ट्राच्या मातीतील राजकारणाला राष्ट्रीय पातळीवरील पॅालिटीक्सची जोड देत ‘राष्ट्र'(rashtra)च्या माध्यमातून इंदरपाल यांनी मराठी सिनेदिग्दर्शनात पदार्पण केलं आहे. या चित्रपटात त्यांनी आजघडीला अतिशय ज्वलंत असणारा आरक्षणाचा महत्त्वपूर्ण मुद्दा मांडला आहे. आजच्या प्रगत समाजात आरक्षणाची नेमकी भूमिका काय आहे याचा उहापोह करण्यासाठी या चित्रपटात मराठीतील दिग्गज कलाकारांची मांदियाळी अवतरली आहे. विक्रम गोखले(vikram gokhale ), मोहन जोशी(mohan joshi), रोहिणी हट्टंगडी, मिलिंद गुणाजी, रीमा लागू, संजय नार्वेकर(sanjay narvekar), गणेश यादव या तगड्या कलाकारांची फळी प्रेक्षकांना चित्रपट पाहायला मिळणार आहे. याव्यतिरिक्त केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले(ramdas athavle) आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्वेसर्वा राजू शेट्टी(raju shetty) हे महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावणारे दोन नेतेही ‘राष्ट्र’च्या निमित्तानं रुपेरी पडद्यावर झळकणार आहेत.

हे ही वाचा –  फक्त मराठी सिने सन्मान पुरस्कारात ‘धर्मवीर’ची बाजी; पटकावले ७ पुरस्कार

- Advertisement -

कोरोनासारख्या महामारीसोबतच समोर आलेल्या सर्व संकटांवर मात करीत अखेर ‘राष्ट्र’ प्रेक्षकांच्या भेटीला येत असल्याने निर्माते बंटी सिंग यांनी आनंद होत असल्याची भावना व्यक्त केली आहे. हा चित्रपट भारतीय राजकारणातील कच्चे दुवे समोर आणणारा असून, आरक्षण या मुद्द्यावर विचारमंथन करणारा असल्याने प्रत्येकाच्या जीवनाशी निगडीत असल्याचं मत दिग्दर्शक इंदरपाल सिंग यांनी व्यक्त केलं आहे. संगीतकार निखिल कामत आणि इंदरपाल सिंग यांनी या चित्रपटाला संगीत दिलं आहे.

हे ही वाचा –  ‘बिग बॉस १६’ मध्ये असणार वॉटर थिम; पहिली झलक आली समोर

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -