घरट्रेंडिंगपंख पसरवून कबुतराने मारले फ्लिप्स; व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल

पंख पसरवून कबुतराने मारले फ्लिप्स; व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल

Subscribe

एका व्यक्तिने २८ जुलै रोजी हा व्हिडीओ आपल्या ट्वीटर अकाऊंटला शेअर केला आहे. तसेच आत्तापर्यंत याला ४.३ मिलिनय व्यू़ज मिळाल्या आहेत

सोशल मीडियावर प्राण्यांचे आणि पक्षांचे अनेक व्हिडीओ वारंवार व्हायरल होत असतात. त्यांपैकी काही व्हिडीओ असे असतात, जे पाहिल्यावर आपला आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नाही. आता असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. जो पाहून तुम्ही आश्चर्यचकित होऊ शकता. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये एक कबूतर बॅकफ्लिप करत आहे. हा व्हिडीओ पाहून लोकांची आवाक् झाले आहेत. एका व्यक्तिने २८ जुलै रोजी हा व्हिडीओ आपल्या ट्वीटर अकाऊंटला शेअर केला आहे. तसेच आत्तापर्यंत याला ४.३ मिलिनय व्यू़ज मिळाल्या आहेत.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता बरेच कबूतर यामध्ये दिसत आहेत. ज्यामध्ये एक काळ्या आणि निळ्या रंगाचे कबूतर सुद्धा आहे. व्हिडीओ नीट लक्षपूर्व पाहिले तर तुमच्या लक्षात येईल की, एक कबूतर आपल्या एक पंजा पुढे करतो आणि दुसरा पंजा पुढे करतो. त्यानंतर हळूच आपले पंख हवेमध्ये पसरवतो आणि अचानक पूर्ण ताकद लावून उल्टी उडी मारतो.त्यानंतर तो एका मागे एक अनेक फ्लिप्स मारतो. आत्तापर्यंत असे फ्लिप्स मारताना आपण केवळ माणसांनाच पाहिले असेल. पण आता कबूतर सुद्धा अश्या प्रकारचे फ्लिप्स मारताना पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहे.

- Advertisement -

सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हिडीओ व्हायरल होत असून नेटकरी यावर अनेक कमेंट्स करत आहेत.


हेही वाचा :गणेशोत्सवाला अवघा एक महिना शिल्लक; गणेशमूर्तीकारांची राज्य सरकारकडे ‘ही’ महत्त्वाची मागणी

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -