घरताज्या घडामोडीसंसदेच्या दोन्ही सभागृहात विरोधक-सत्ताधारी भिडले, सोमवारपर्यंत कामकाज तहकूब

संसदेच्या दोन्ही सभागृहात विरोधक-सत्ताधारी भिडले, सोमवारपर्यंत कामकाज तहकूब

Subscribe

आधी दुपारी १२ वाजेपर्यंत अधिवेशन स्थगित करण्यात आले होते. त्यानंतर, हे अधिवेशन सोमवारपर्यंत स्थगित करण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली.

संसदेचे पावसाळी अधिवेशन (Rainy session in sansad) १८ जुलैपासून सुरू झाले आहे. महागाई, बेरोजगारी, जीएसटी आणि अग्निपथच्या मुद्द्यावर विरोधकांनी संसदेच्या अधिवेशनात आवाज उठवला. मात्र, त्यांच्या प्रश्नांवर सत्ताधाऱ्यांनी उत्तरे देणं टाळलं आहे. आजही संसदेच्या दोन्ही सभागृहात गोंधळ पाहायला मिळाला. त्यामुळे आधी दुपारी १२ वाजेपर्यंत अधिवेशन स्थगित करण्यात आले होते. त्यानंतर, हे अधिवेशन सोमवारपर्यंत स्थगित करण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली. (Upper house, lower house adjournment till Monday)

हेही वाचामुलाचे आडनाव ठरवण्याचा आईलाच अधिकार, सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

- Advertisement -

आज लोकसभेतील कामकाजाला सुरुवात होताच विरोधकांनी महागाईवर चर्चा करण्याची मागणी केली. मात्र, सत्ताधाऱ्यांनी राष्ट्रपत्नी या कॉमेंटवरून काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी माफी मागावी अशी मागणी केली. यामुळे सभागृहात गोंधळ झाला. परिणामी लोकसभाचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी दुपारी १२ वाजेपर्यंत अधिवेशन स्थगित केले. १२ वाजता अधिवेशन सुरू झाल्यानंतर विरोधक आणि सत्ताधाऱ्यांनी पुन्हा गोंधळ घातला. त्यामुळे लोकसभेची कार्यवाही सोमवारपर्यंत स्थगित करण्यात आली आहे.

हेही वाचा – राज्याच्या परवानगीशिवाय सीबीआय तपास करू शकणार नाही, शिंदेंनी निर्णय ठेवला कायम

- Advertisement -

तर, दुसरीकडे राज्यसभेतही विरोधी पक्षातील खासदारांनी महागाईवर चर्चा करण्याची मागणी केली. यावर उपसभापती हरिवंश यांनी सांगितलं की, ‘राज्यसभेचे अध्यक्ष यांनी कालच सांगितलं की पुढच्या आठवड्यात महागाईवर चर्चा होईल, त्यामुळे आज कोणतीही नोटीस स्विकारली जाणार नाही.’ यावरून विरोधी पक्षाने संसदेत गोंधळ घातला. यामुळे इथेही दुपारी १२ वाजेपर्यंत स्थगिती देण्यात आली. त्यानंतर सोमवारपर्यंत कामकाज स्थगित करण्यात आले.

हेही वाचार्नाटकात भाजपच्या युवा नेत्यानंतर आणखी एका २३ वर्षीय तरुणाची हत्या; कलम १४४ लागू

भाजपच्या खासदारांनी काँग्रेसविरोधात रणनीती आखली आहे. सोनिया गांधींनी संसदेच्या दोन्ही सभागृहात माफी मागितली पाहिजे, अशी मागणी भाजप खासदारांकडून करण्यात येणार आहे. जे.पी.नड्डा, राजनाथ सिंह, अर्जुन मेघवाल, पीयूष गोयल, प्रल्हाद जोशी यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. तर, दुसरीकडे काँग्रेसनेही भाजपविरोधात वातावरण तयार केलं आहे. काँग्रेसने गांधींच्या प्रतिमेसमोर आंदोलन करत स्मृती इराणी यांनी माफी मागावी अशी मागणी केली आहे. सोनिया गांधींविरोधात स्मृती इराणी अत्यंत वाईट पद्धतीने वागल्या आहेत. स्मृती इराणींची मानसिक स्थिती व्यवस्थित नसल्याचाही दावा काँग्रेसने केला आहे.

हेही वाचा – देशात नव्या कोरोनाबाधितांचा आकडा स्थिरावला; मृत्यूदरात किंचित घट

अधिवेशन सुरू झाल्यापासून खासदारांकडून गोंधळ निर्माण होत असल्याने आतापर्यंत राज्यसभेच्या २७ खासदारांना निलंबित करण्यात आले आहे. तर, लोकसभेच्या चार खासदारांना संपूर्ण अधिवेशनदरम्यान निलंबित केलं आहे. दरम्यान, राज्यसभेच्या २३ खासदारांचे निलंबन आज संपणार आहे.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -