घरदेश-विदेशअविनाश भोसलेंची लंडनमध्ये 300 कोटींची संपत्ती; CBI आरोप पत्रातून खुलासा

अविनाश भोसलेंची लंडनमध्ये 300 कोटींची संपत्ती; CBI आरोप पत्रातून खुलासा

Subscribe

येस बँक आणि डीएचएफएल प्रकरणी केंद्रीय तपास यंत्रणा सीबीआयने आरोपपत्र दाखल केलं आहे. या आरोपपत्रात अटकेत असलेले पुण्यातील बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांनी वेगवेगळ्या माध्यमातून मिळवलेली 300 कोटींचा निधी लंडनमध्ये संपत्ती विकत घेण्यासाठी वापरल्याचा उल्लेख करण्यात आला आहे.

अविनाश भोसलेंनी 2018 मध्ये येस बँकेचे राणा कपूर यांच्या माध्यमातून 700 कोटींचे कर्ज घेतले होते. या पैशातून भोसलेंनी लंडनमध्ये फाइव्ह स्ट्रॅण्ड येथे संपत्ती विकत घेतली. या संपत्तीची किंमत जवळपास 1 हजार कोटी इतकी आहे. दरम्यान भोसलेंच्या मालकीच्या कंपनीला 68 कोटी 82 लाख रुपये सल्लागार फी, 183 कोटी रुपये डीएचएफएलकडून कर्ज म्हणून मिळाले, तर रेडियस समुहाकडून कंपनीने 317 कोटी 40 लाख रुपये घेतल्याचे आरोपपत्रात उल्लेख करण्यात आला आहे.

- Advertisement -

तपासादरम्यान अविनाश भोसले यांनी एकूण 569 कोटी 22 लाख रुपयांपैकी 300 कोटी रुपये लंडनमध्ये फाइव्ह स्ट्रॅण्ड येथे संपत्ती विक त घेतली. या संपत्तीची एकूण किंमत 92.5 मिलियन जीबीपी (ब्रिटीश चलन) इतकी होती. ही संपत्ती युनायटेड किंग्डममधील नोंदणीकृत कंपनी असलेल्या फ्लोरा डेव्हलपमेंट लिमिटेडच्या माध्यमातून विकत घेतली होती. या व्यवहारासाठी 70 जीबीपी मिलियनची रक्कम कर्ज स्वरुपात आरोपी राणा कपूर किंवा येस बँक यांना एप्रिल 2018 मध्ये फ्लोरा डेव्हलपमेंट्स लिमिटेडला दिले. असं सीबीआयने आरोपपत्रात म्हटले आहे.

तसेच केंद्रीय तपास यंत्रणेने आरोपी कपील वाधवान, धीरज वाधवान, राणा कपूर, संजय राजकुमार छाबरिया, अविनाश भोसले, सत्यन गोपालदास तंडन यांनी एकत्र मिळून येस बँकेची आर्थिक फसवणूक करण्याची योजना बनवण्याची योजना आखल्याचे आरोपपत्रात म्हटले आहे.

- Advertisement -

कपील आणि धीरज वाधवान यांनी 2018 मध्ये बेकायदेशीरपणे 4 हजार 733 कोटी रुपयांचा निधी हा गुंतवणूक किंवा कर्जाच्या माध्यमातून येस बँकेकडून डीएचएफएल आणि बिलीफ रिलॅलिटर्स प्रायव्हेट लिमिटेडकडे वळवला, हा पैसा त्यांनी बेकायदेशीरपणे वळवण्यासाठी कपूर, छाबरिया आणि भोसले यांच्या कंपन्यांनी मदत केली, असं आरोपपत्रात म्हटलं आहे.


1 डिसेंबरपासून तंबाखूजन्य उत्पादनांवर दिसणार नवा फोटो

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -