घरमहाराष्ट्रहुंकार रॅलीमध्ये मोहन भागवतांचा हुंकार, राम मंदिर झालंच पाहिजे!

हुंकार रॅलीमध्ये मोहन भागवतांचा हुंकार, राम मंदिर झालंच पाहिजे!

Subscribe

नागपूरमध्ये आयोजित विश्व हिंदू परिषदेच्या हुंकार रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे. यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी राम मंदिरासाठी सरकारने कायदा बनवावा अशी मागणी जोरकसपणे केली आहे.

नागपूरमध्ये विश्व हिंदू परिषदेकडून हुंकार रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे. या परिषदेमध्ये अयोध्येमध्ये राम मंदिर बांधलं जावं अशी मागणी जोरकसपणे मांडण्यात आली. त्यामध्ये इतर मान्यवरांसोबतच सरसंघचालक मोहन भागवत यांचंदेखील भाषण झालं. यावेळी मोहन भागवत यांनी अयोध्येमध्ये राम मंदिरासाठी सरकारने कायदा आणावा आणि जोपर्यंत कायदा मंजूर होत नाही, तोपर्यंत जनजागृती करत राहा‘, असं आवाहन भागवतांनी उपस्थितांना केलं. तसंच, ‘दुसरं कुणी राम मंदिराच्या जागेवर दावा कसं करू शकतं?’ असा सवालही त्यांनी यावेळी केला. दरम्यान, एकीकडे उद्धव ठाकरेंनी एकीकडे अयोध्येमध्ये जाऊन राम मंदिरासाठी जोरदार वातावरण निर्मिती केली असतानाच दुसरीकडे सरसंघचालक मोहन भागवत यांनी नागपुरात हुंकार रॅलीमध्ये भरलेल्या या हुंकारामुळे देशातलं वातावरण तापायला सुरूवात झाली आहे.

अवघ्या काही महिन्यांवर देशात लोकसभा निवडणुका येऊन ठेपल्या असतानाच अयोध्येतल्या राम मंदिराचा मुद्दा तापू लागला आहे. त्यामुळे यावर राजकीय खेळी म्हणून टीका होऊ लागली आहे. मात्र, विश्व हिंदू परिषद, शिवसेना, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अशा संघटना आणि पक्षांनी राम मंदिराच्या मुद्द्यावरून मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यास सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर नागपूरमध्ये विश्व हिंदू परिषदेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या हुंकार रॅलीमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी राम मंदिराच्या मागणीचा पुनरुच्चार केला.

- Advertisement -

रामाचं नाही तर कुणाचं मंदिर बनणार?

यावेळी बोलताना या देशात रामाचं नाही तर कुणाचं मंदिर बनणार? असा सवाल मोहन भागवत यांनी उपस्थित केला आहे. राम मंदिराची मागणी इतक्या जोरकसपणे होत असून देखील न्यायव्यवस्थेकडून त्याला विलंब लावला जात असेल तर त्याचा अर्थ ही गोष्ट न्यायपालिकेच्या लिस्टमध्ये प्रायॉरिटीवर नाही, असं म्हणत भागवतांनी न्याय व्यवस्थेवर देखील निशाणा साधला.

तिथे राम मंदिरच होतं हे सिद्ध झालंय

दरम्यान, यावेळी बोलताना मोहन भागवतांनी वादग्रस्त राम जन्मभूमीच्या जमिनीवर रामाचंच मंदिर होतं हे सिद्ध झाल्याचा उल्लेख केला. आर्किओलॉजी विभाग आणि या प्रकरणातल्या साक्षीदारांसमोर सदर जमिनीवर उत्खनन केल्यानंतर देखील तिथे राम मंदिरच होतं हे सिद्ध झालं आहे. तरी देखील राम मंदिर बांधण्यासाठी विलंब लावला जात आहे, असं मोहन भागवत यावेळी म्हणाले.

- Advertisement -

तुम्ही हे वाचलंत का? – मंदिर नाही तर सरकार नाही; उध्दव ठाकरेंचा भाजपला इशारा

मग जस्टिस डिलेडची म्हण शिकवू नका

कित्येक वर्षांपासून राम मंदिराची मागणी होत आहे. जर तिथे पूर्वी राम मंदिर होतं हे सिद्ध होऊन देखील राम मंदिर बांधलं जात नसेल, तर देशातल्या शाळाकॉलेजांमधून जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनायडही इंग्रजी म्हण शिकवणं सोडून द्या, असा टोला देखील भागवतांनी यावेळी सरकारला लगावला.

राम मंदिर बनवायचं कसं? हा विचार सरकारने करावा

दरम्यान, यावेळी सरसंघचालक मोहन भागवत यांनी भाजप सरकारला देखील कानपिचक्या दिल्या आहेत. ‘राम मंदिरासाठी सरकारने कायदा आणायलाच हवा. अयोध्येमध्ये राम मंदिर बनायलाच हवं. आता ते कसं बनवायचं हा विचार त्यांनीच करायला हवा‘, असं भागवत म्हणाले. त्याचसोबत, ‘सरकारवर राम मंदिरासाठी दबाव आणण्यासाठी सगळ्यांनीच प्रयत्न करण्याची गरज असून व्यापक जनजागृती व्हायला हवी‘, असं देखील ते म्हणाले.


हेही वाचा – उद्धव ठाकरे सहपरिवार तिर्थयात्रेला गेल्याचे दिसून आले – विखे पाटील
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -