घरताज्या घडामोडीआम्ही शांत आहोत, पण..; सामंतांवरील हल्ल्यानंतर गुलाबराव पाटलांचा इशारा

आम्ही शांत आहोत, पण..; सामंतांवरील हल्ल्यानंतर गुलाबराव पाटलांचा इशारा

Subscribe

शिंदे गटातील बंडखोर आमदार उदय सामंत यांच्या गाडीवर काल (मंगळवार) पुण्यात हल्ला करण्यात आला. पुण्यात झालेला हल्ला हा निंदनीय आहे. त्याचे समर्थनही करता येणार नाही. एखाद्या व्यक्तिचा विचार किंवा त्याने घेतलेला निर्णय तुम्हाला पटला नाही म्हणून त्याच्यावर हल्ला करणार का?, आपल्याकडे लोकशाही आहे. अशा पद्धतीने गाडीवर हल्ला करणे अत्यंत चुकीचे आहे. यावर आम्ही अगदी शांत आहोत. पण याचा अर्थ आम्ही हतबल आहोत असा होत नाही, असा इशारा शिंदे गटाचे आमदार गुलाबराव पाटील यांनी शिवसेनेला दिला आहे.

आम्ही शांत आहोत, पण…

- Advertisement -

गुलाबराव पाटील यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, उदय सामंत यांच्या गाडीवर झालेला हल्ला हा चुकीचा आणि लोकशाहीला लाजवणारा आहे. विचारांची लढाई ही अशा पद्धतीने बदला घेऊन लढली जात नसते. त्यासाठी लोकशाही पद्धतीने निवडणुकीत तुम्ही त्याला पराभूत करू शकता. सामंत यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्यानंतर आम्ही शांत आहोत, पण हतबल नाही, असं पाटील म्हणाले.

शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले

- Advertisement -

राज्यातील मंत्रीमंडळ विस्तार लवकर व्हावा, ही आमची देखील इच्छा आहे. कारण अनेक भागात पूर परिस्थिती होती, शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले, त्यांना तातडीने मदत मिळणे गरजेचे आहे, असं पाटील म्हणाले.

आम्हीही रस्त्यावर उतरून हल्ले करू

अब्दुल सत्तार, गुलाबराव पाटील यांच्यासह अनेक आमदार हे आक्रमक झाले आहेत. सत्तार यांनी आम्हीही रस्त्यावर उतरून हल्ले करू, असा इशारा दिल्यानंतर गुलाबराव पाटील यांनी देखील सूचक इशारा दिला आहे.

दरम्यान, शिंदे गटाच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होती. आमचा न्याय देवतेवर विश्वास आहे, निकाल आमच्या बाजूनेच लागेल, असा विश्वास देखील पाटील यांनी व्यक्त केला आहे.


हेही वाचा : महापालिका नगरसेवकांच्या संख्येत घट; मुंबईत २३६ ऐवजी २२७ नगरसेवक राहणार


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -