घरदेश-विदेशनियमित दारु पिण्याऱ्यांमध्ये भारतात पुरुषांपेक्षा महिलांची संख्या वाढली

नियमित दारु पिण्याऱ्यांमध्ये भारतात पुरुषांपेक्षा महिलांची संख्या वाढली

Subscribe

एका वैद्यकीय मासिकाने दिलेल्या अहवालानुसार, गेल्या काही वर्षांपासून भारतात दारु पिणाऱ्यांची घटली आहे. परंतु, धक्कादायक म्हणजे नियमित दारु पिणाऱ्या महिलांची संख्या मात्र वाढली आहे.

एखाद्या अट्टल मद्यपीला दारु पिण्यासाठी खास कारण लागत नाही. काहीजणांना नियमित दारु पिण्याची सवय असते. तर, काहीजण खास कारणाकरताच दारु पितात. त्यामुळे भारतात दारु पिणाऱ्यांचं प्रमाण जास्त झालं असल्याची भिती व्यक्त करण्यात येते. मात्र, एका वैद्यकीय मासिकाने दिलेल्या अहवालानुसार, गेल्या काही वर्षांपासून भारतात दारु पिणाऱ्यांची घटली आहे. परंतु, धक्कादायक म्हणजे नियमित दारु पिणाऱ्या महिलांची संख्या मात्र वाढली आहे. (Liquor Survey More Women Drink Every Day Than Men But Total Number Reduced)

हेही वाचा – टॅटू काढण्याआधी करा ‘या’ नियमांचे पालन; नाहीतर होतील हे गंभीर आजार

- Advertisement -

अल्कोहोल आणि अक्लोहोलिजम जर्नलमध्ये आलेल्या अहवालानुसार, २०१५-१६ मध्ये झालेल्या सर्वेक्षणात सामील झालेल्या पुरुषांपैकी २९.५ टक्के पुरूष दारु पित होते तर, २०१९-२१ च्या सर्वेक्षणातून हा आकडा २२.९ टक्क्यांवर घसरला आहे. म्हणजेच, गेल्या काही वर्षांत भारतात दारू पिण्याऱ्यांची संख्या घटल्याचं प्रथमदर्शनी दिसत आहे. या सर्वेक्षणानुसार, १५.४ टक्के पुरुषांनी सांगितलं की ते रोज निमयित दारू पितात. तर, आठवड्यातून एकवेळ दारू पिणाऱ्यांची संख्या ४३.५ टक्के होती आणि कधीतरीच दारू पिणाऱ्यांची संख्या ४१ टक्के होती.

याच अहवालानुसार आलेल्या माहितीनुसार, ०.७५ टक्के महिला दारू पितात. तर, २०१५-१६ मध्ये झालेल्या सर्वेक्षणानुसार १.२३ टक्के महिला दारू पित होत्या. म्हणजेच, या महिलांमध्येही दारू पिण्याचं प्रमाण घटलं आहे. पण, नियमित दारू पिणऱ्या महिलांची टक्केवारी १६.९ टक्के आहे. तर आठवड्यातून कमीत कमी एकवेळा दारू पिणाऱ्या महिलांची टक्केवारी ३६.६ आहे तर, कधीतरी पिणाऱ्या महिलांची टक्केवारी ४६.६ टक्के आहे.

- Advertisement -

हेही वाचा – पुरुष आपल्या प्रेयसी आणि पत्नीला वारंवार सांगतात ‘या’ खोट्या गोष्टी

या मासिकातील लेखक डॉ.यतनपाल सिंह बलहारा यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा एक सकारात्मक संदेश आहे की काहीच लोक दारु पित आहेत. पण जे दारु पितात त्यांच्यात नियमित दारू पिण्याची सवय बळावत चालली आहे. त्यामुळे दारुमुळे होणारे आजार रोखण्यासाठी हे रोखलं पाहिजे.

  • लक्षद्विप – पुरुष ०.४ टक्के, महिला ० टक्के
  • बिहार – पुरुष १५.५ टक्के, महिला ०.४ टक्के
  • गुजरात पुरुष ५.८ टक्के, महिला ०.६ टक्के
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -