Eco friendly bappa Competition
घर लाईफस्टाईल टॅटू काढण्याआधी करा 'या' नियमांचे पालन; नाहीतर होतील हे गंभीर आजार

टॅटू काढण्याआधी करा ‘या’ नियमांचे पालन; नाहीतर होतील हे गंभीर आजार

Subscribe

टॅटू काढताना केवळ एक दोनदा नव्हे तर दहा वेळा विचार करून टॅटू काढा त्याआधी योग्य त्या नियमांचे पालन करा.

आजकाल सगळीकडे टॅटू काढण्याची क्रेझ मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. असं म्हणतात की आवड जोपासने ही खूप मोठी गोष्ट आहे. ही आवड पूर्ण करण्यासाठी लोक कितीही त्रास सहन करू शकतात. दरम्यान, मागील एक दोन दिवसांपूर्वी उत्तरप्रदेशातून एक धक्कादायक घटना समोर आली होती. खरंतर उत्तर प्रदेशातील वाराणसीमध्ये 14 जणांना टॅटूसाठी एकच सुई वापरल्याने जणांना एड्सची लागण झाली आहे.

त्यामुळे आता टॅटू काढताना केवळ एक दोनदा नव्हे तर दहा वेळा विचार करून टॅटू काढा त्याआधी योग्य त्या नियमांचे पालन करा.

- Advertisement -

टॅटू काढण्याआधी करा ‘या’ नियमांचे पालन

  • सगळ्याआधी महत्वाची गोष्ट म्हणजे टॅटू काढण्यासाठी अशा ठिकाणी जा ज्या व्यक्तिकडे टॅटू काढण्याचं अधिकृत लायसन्स असेल.
  • त्यानंतर टॅटू स्टिडीओमध्ये स्वच्छता आहे की नाही याची खात्री करून घ्या.
  • टॅटू काढण्याऱ्या व्यक्तिने स्वच्छ कपडे परिधान केलेले असावे.
  • टॅटू काढण्याआधी कोणती डिझाईन काढयची याबाबत खात्री करून घ्या.
  • टॅटू काढण्यासाठी वापरली जाणारी सुई नवीन आणि उत्तम दर्जाची असावी याची खात्री करून घ्या.
  • टॅटू काढल्यानंतर टॅटू आर्टिस्टला तुमच्यासाठी वापरलेली सुई फेकून द्यायला सांगा.
  • टॅटू गोंदवून घेतल्यानंतर कमीत कमी चार ते पाच तास तो टॅटू कापसाने कव्हर करा.
  • टॅटू काढल्यानंतर काही दिवस त्या जागेला इतर कोणाचा स्पर्श होणार नाही याची काळजी घ्या.
  • टॅटू काढल्यानंतर उन्हात जाऊ नका.
- Advertisement -

टॅटू काढताना काळजी न घेतल्यास होऊ शकतात ‘हे’ 3 आजार

  • हेपेटाइटिस बी
  • व्हायरल इंफेक्शन
  • एच आय व्ही

हेही वाचा :टॅटू गोंदवणं आलं अंगलट! एकच सुई वापरल्याने 14 जणांना एड्सची लागण

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -