घरताज्या घडामोडीहोनी को अनहोनी कर दे..! सत्तारांना मंत्रिपद तर शिरसाट यांचा पत्ता कट,...

होनी को अनहोनी कर दे..! सत्तारांना मंत्रिपद तर शिरसाट यांचा पत्ता कट, नक्की काय घडलं?

Subscribe

शिंदे सरकारचा बहुचर्चित असलेला मंत्रिमंडळाचा विस्तार आज झाला. राजभवनातील दरबार हॉलमध्ये शिंदे गट आणि भाजप यांच्याकडून एकूण १८ मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यावेळी शिंदे गटाचे नेते अब्दुल सत्तार हे टीईटी परीक्षा घोटाळ्यामुळे चांगलेच चर्चेत आले होते. आजही त्यांना मंत्रिपद मिळणार की नाही?, याबाबत राजकीय वर्तुळात अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते. मात्र, अब्दुल सत्तारांची थेट कॅबिनेटमध्ये बढती झाली असून त्यांनी विरोधकांसह अनेकांना मोठा धक्का दिला आहे.

टीईटी घोटाळ्यात त्यांचे नाव समोर आल्यानंतर सत्तारांच्या मंत्रिपदाच्या अपेक्षा मावळल्या होत्या. शिक्षण उप संचालक आणि शिक्षणाधिकारी यांनी सत्तारांना क्लिन चिट दिली होती. त्यामुळे सत्तार रात्री ३ वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना शिक्षण विभागाचे क्लीन चिट दिल्याचे पत्र घेऊन त्यांची भेट घेतली आणि त्यांनी पहिल्या मंत्रिमंडळात स्थान मिळवले. दुसरीकडे मंत्रिमंडळात संजय शिरसाट यांना स्थान मिळणार असल्याची जोरदार चर्चा होती. मात्र, त्यांना स्थान मिळालं नसल्यामुळे ते प्रचंड नाराज असल्याचं सांगितलं जात आहे.

- Advertisement -

संजय शिरसाट यांचं नाव चर्चेत

शिंदे गटाच्या बंडखोर आमदारांमध्ये संजय शिरसाट यांचं नाव फार चर्चेत होतं. यासंदर्भात यादी देखील तयार करण्यात आली होती. मात्र, मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतरही त्यांचे नाव नसल्यामुळे समर्थकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड मोठा उत्साह होता. काही कार्येकर्त्ये देखील मुंबईत दाखल झाले होते. मात्र त्यांच्या नावाची घोषणा न झाल्यामुळे समर्थक नाराज झाले आहेत.

- Advertisement -

मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अब्दुल सत्तारांनी प्रतिक्रिया

मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अब्दुल सत्तारांनी प्रतिक्रिया दिली आहे. माझ्यावर झालेल्या आरोपांमध्ये सत्यता असती तर आम्हाला अडचण आली असती. शिक्षण उपसंचालकांनी याबाबत खुलासा केला आहे. माझ्या मुलींनी टीईटी प्रमाणपत्राच्या आधारे कुठलाही लाभ घेतला नसल्याचे हे पत्र आहे. त्यामुळे या आरोपात सत्यता नाही, असं अब्दुल सत्तार म्हणाले.

अब्दुल सत्तारांची राजकीय कारकीर्द काय?

अब्दुल सत्तार हे औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड विधानसभा मतदारसंघातील आमदार आहेत. 1 जानेवारी 1965 साली अब्दुल सत्तारांचा जन्म औरंगाबादच्या सिल्लोड गावातील एका सामान कुटुंबात झाला. सत्तार यांच्या राजकीय कारकिर्दीला 1984 पासून सुरूवात झाली.

कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना 1984 साली ग्रामपंचायतची निवडणूक लढवून ते जिंकून आले. 2001 साली अब्दुल सत्तार हे विधानपरिषदेवर निवडून गेले. 2014 साली कॉंग्रेसच्या मंत्रीमंडळात ते काही महीने कॅबिनेट मंत्री झाले. 2019 च्या विधानसभा निवडणुकीवेळी त्यांनी कॉंग्रेस पक्ष सोडून शिवसेनेत प्रवेश केला.


हेही वाचा : भाजपानेच उडवलेला चिखल साफ धुण्याचे वॉशिंग मशीन भाजपाकडेच, सचिन सावंतांची टीका


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -