घरमहाराष्ट्रबेस्ट बसचा ब्रेक अचानक झाला फेल; प्रवासी बालंबाल बचावले

बेस्ट बसचा ब्रेक अचानक झाला फेल; प्रवासी बालंबाल बचावले

Subscribe

बसने झाडाला जोरदार धडके दिल्यामुळे नजीकच्या रिक्षा, चारचाकी वाहन यांचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने मोठी जीवितहानी टळली.

मुंबई – बेस्ट परिवहन विभागाच्या शिवशाही प्रकल्प ते कुर्ला पश्चिम स्थानकादरम्यान धावणाऱ्या बेस्ट बसचा
संतोष नगर दिंडोशी येथे मंगळवारी दुपारच्या सुमारास अचनाकपणे ब्रेक फेल झाल्याने अपघात झाला. या अपघातात बस चालक, वाहक, एक रिक्षा चालक व दोन प्रवासी असे पाच जण जखमी झाले. त्यांच्यावर जोगेश्वरी येथील ट्राॅमा व कांदिवली येथील शताब्दी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर बसने झाडाला जोरदार धडके दिल्यामुळे नजीकच्या रिक्षा, चारचाकी वाहन यांचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने मोठी जीवितहानी टळली.

हेही वाचा – मुंबईत जोरदार पाऊस; इमारतीच्या कमानीचा भाग कोसळून २ जण जखमी

- Advertisement -

मात्र या अपघाताची बेस्ट उपक्रमाने गंभीर दखल घेतली असून याप्रकरणी चौकशी करण्यात येणार आहे. सदर अपघाताबाबत स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. प्राप्त माहितीनुसार, बेस्ट परिवहन विभागाच्या शिवशाही प्रकल्प ते कुर्ला पश्चिम स्थानकादरम्यान प्रवाशांना घेऊन धावणाऱ्या बेस्ट रुट नंबर ३२६ बस क्रमांक एमएच ० – एपी ०४७६ या बसचा संतोष नगर दिंडोशी येथे मंगळवारी दुपारी ३.४५ वाजता ब्रेक फेल झाला.

हेही वाचा – अमेरिकेचे मुंबईचे वाणिज्यदूत माईक हँकी यांनी घेतली राज्यपालांची भेट

- Advertisement -

या दुर्घटनेत सदर बसने समोरील रिक्षा, चारचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने त्यामध्ये सदर वाहनांचे मोठे नुकसान झाले. तर पाच जण जखमी झाले. यामध्ये, बस वाहक आबासाहेब कोरे (५४), बस चालक पुंडलिक किसन धोंगडे (४३) आणि रिक्षा चालक भुवाल सरकू पांडे (४५) या तिघा जखमींना उपचारासाठी तात्काळ जोगेश्वरी येथील हिंदूहृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे महापालिका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर आणखीन दोन जखमी प्रवासी गोविंद प्रसाद पाठक (८०), रजनिष कुमार पाठक (३७) यांना दिंडोशी येथील वेदांत या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

हेही वाचा – महाराष्ट्रात रेड अलर्ट जारी! एनडीआरएफ, एसडीआरएफच्या १४ तुकड्या तैनात

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -