घरमुंबईशिंदे गटाकडून मुंबईसाठी रणनीती; दादरमध्ये मुख्यालय बांधणार, जागोजागी शाखा उभारणार

शिंदे गटाकडून मुंबईसाठी रणनीती; दादरमध्ये मुख्यालय बांधणार, जागोजागी शाखा उभारणार

Subscribe

शिंदे साहेबांच्या कामाची गती पाहता त्यांना चांगल्या कार्यालयाची गरज आहे. त्यामुळे दादरमध्येच त्यांचं एक मुख्य कार्यालय असेल. त्यांच्या नेतृत्वाखाली इतर शाखा काम करतील, असं सदा सरवणकर म्हणाले.

मुंबई – एकनाथ शिंदे गट (Eknath Shinde Group) आता मुंबईतच नवं मुख्यालय उभारणार असल्याची माहिती समोर आली आहे. महत्त्वाचं म्हणजे शिंदे गटाचं मुख्यालय दादरमध्येच बांधणार असल्याची माहिती शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर (Sada Sarvankar) यांनी दिली. त्यामुळे आता पुन्हा उद्धव ठाकरे विरुद्ध शिंदे गट अशी टफ फाईट पाहायला मिळणार आहे. दरम्यान, आजच उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या माजी नगरसेवकांची बैठक घेऊन त्यांना पालिका निवडणुकीसाठी तयारी करण्याचे आवाहन केले आहे.

हेही वाचा…तर शहीद झालो असतो, एकनाथ शिंदेंची धक्कादायक माहिती

- Advertisement -

गेल्या दोन महिन्यांपासून राज्यात ठाकरे विरुद्ध शिंदे गट असा सामना संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला. एकनाथ शिंदे यांना ठाण्यातून तुफान प्रतिसाद मिळत आहे. तर, मुंबईतीलही अनेक नगरसेवकांनी त्यांना पाठिंबा दर्शवलाय. त्यामुळे मुंबईतील शिवसैनिकांना आपल्याकडे वळवून घेण्याकरता शिंदे गटाकडून जोरदार हालचाली सुरू आहेत. दरम्यान, आता मुंबईतच शिंदे गटाचं मुख्यालय स्थापन होणार असल्याची माहिती आमदार सदा सरवणकर यांनी दिली.

सदा सरवणकर म्हणाले की, “मुंबईवर ठाकरे गटाचं राज्य आहे, असा आभास निर्माण केला जातोय. मात्र मुंबईकर शिवसैनिकांची उद्धव ठाकरेंवर नाराजी आहे. कारण ते मुख्यमंत्री असताना कोणतीही कामं झाली नाहीत. एकाही बेरोजगाराला नोकरी मिळाली नाही. त्यामुळे आता लवकरच स्वतंत्र शाखा उभारल्या जातील, शाखाप्रमुखांची घोषणा होईल. शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचं काम जोरदार सुरू होईल. शिंदे साहेबांच्या कामाची गती पाहता त्यांना चांगल्या कार्यालयाची गरज आहे. त्यामुळे दादरमध्येच त्यांचं एक मुख्य कार्यालय असेल. त्यांच्या नेतृत्वाखाली इतर शाखा काम करतील.”

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -