घरक्राइम'शिवसंग्राम'चे नेते विनायक मेटे यांच्या मृत्यूच्या तपासासाठी पोलिसांची आठ पथके!

‘शिवसंग्राम’चे नेते विनायक मेटे यांच्या मृत्यूच्या तपासासाठी पोलिसांची आठ पथके!

Subscribe

मुंबई : मराठा आरक्षण आंदोलनातील नेते व माजी आमदार विनायक मेटे यांचा आज पहाटे अपघाती मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूबद्दल संशय व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या मृत्यूची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. त्याअनुषंगाने पोलिसांनी आठ पथके नेमली आहेत.

मुंबईत आज दुपारी बोलावलेल्या मराठा समन्वय समितीच्या बैठकीसाठी शिवसंग्राम संघटनेचे नेते बीडहून येत असताना खालापूर टोलनाका येथे त्यांच्या गाडीचा अपघात झाला. अचानक ट्रक मधे आल्याने वेगात असलेल्या गाडीवर नियंत्रण ठेवणे मेटे यांच्या चालकाला शक्य झाले नाही. परिणामी त्यांची गाडी ट्रकच्या उजव्या बाजूला धडकली. झोपेत असलेल्या मेटे यांच्या डोक्याला मार बसला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर ट्रक निघून गेला. त्या ट्रकचा तपशीलरही मिळालेला नाही. त्याचा तपासही पोलिसांकडून सुरू आहे. त्यासाठी विविध सीसीटीव्ही फूटेज तपासले जात आहे.

- Advertisement -

अपघातानंतर जवळपास तासभर वैद्यकीय मदत मिळाली नाही. रुग्णवाहिकाही विलंबाने पोहोचली. तर, आसपासच्या नागरिकांकडूनही मदत मिळाली नाही, अशी माहिती विनायक मेटे यांच्या गाडीचा चालक एकनाथ कदम यांनी दिली. त्यावरून मराठा क्रांती ठोक मोर्चाने संशय व्यक्त केला आहे. हा अपघात होता की घातपात होता? याची आम्हाला शंका आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी व्हायला हवी, असे मराठा क्रांती ठोक मोर्चाचे नेते आणि मराठा समन्वयक बाळासाहेब खैरे पाटील यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील याच्या सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत.

या पार्श्वभूमीवर पोलिसांनी या अपघाताची चौकशी सुरू केली असून त्यासाठी फॉरेन्सिकसह आठ पथके नेमण्यात आली आहेत. लवकरच सगळ्या गोष्टी निष्पन्न होतील, अशी माहिती पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांनी दिली. वाहनचालक एकनाथ कदम यांची रसायनी पोलिसांकडून चौकशी सुरू असून त्यांचा जबाब नोंदवला जात आहे. या अपघातात एकनाथ कदम सुदैवाने बचावले आहेत. त्यांना किरकोळ इजा झाल्याचे सांगण्यात येते. त्यांची वैद्यकीय चाचणी देखील करण्यात येणार आहे.

Manoj Joshi
Manoj Joshihttps://www.mymahanagar.com/author/mjoshi/
प्रिंट, चॅनल आणि डिजिटल या तिन्हीचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -