घरदेश-विदेशसावरकरांच्या पोस्टरवरून कर्नाटकात तणाव, शिवमोगा जिल्ह्यातील काही भागांत कर्फ्यू

सावरकरांच्या पोस्टरवरून कर्नाटकात तणाव, शिवमोगा जिल्ह्यातील काही भागांत कर्फ्यू

Subscribe

बंगळुरू : भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सर्वत्र उत्साहात साजरा केला जात असतानाच कर्नाटकमधील शिवमोगा जिल्ह्यातील काही भागांत तणव निर्माण झाल्याने तिथे कर्फ्यू लावण्यात आला आहे. स्वातंत्र्य दिनी अमीर अहमद सर्कलमध्ये वीर सावरकर यांचा पोस्टर लावण्यावरून हा तणाव निर्माण झाल्याचे सांगण्यात येते. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

- Advertisement -

अमीर अहमद सर्कल येथे वीर सावरकर यांचे पोस्टर लावण्यात आले होते. मात्र टिपू सुल्तान समर्थकांनी टिपू सुल्तानचा बॅनर लावण्यासाठी वीर सावरकर यांचा बॅनर हटविण्याचा प्रयत्न झाला. हिंदू समर्थक कार्यकर्त्यांनी सावरकरांचा बॅनर हटविण्याच्या प्रयत्नांविरोधात निषेध नोंदवला. त्यानंतर दोन्ही गटात वाद होऊन हाणामारीला सुरुवात झाली. त्यात एक जण जखमी झाला. त्यामुळे तिथे तणाव निर्माण झाल्याने पोलिसांना तिथे सौम्य लाठीमारही करावा लागला. त्यानंतर काही भागांत कर्फ्यू लागू करण्यात आला आहे.

तत्पूर्वी, काँग्रेस कार्यकर्त्यांनी शनिवारी रात्री हडसन सर्कलमध्ये वेगवेगळ्या स्वातंत्र्यसैनिकांचे फोटो असलेले पोस्टर लावले होते. त्यात टिपू सुल्तानचा पोस्टरही होता. काही अज्ञात व्यक्तींनी ही पोस्टर्स फाडली होती. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली असून त्यात राष्ट्र रक्षा पदे या संघटनेचा अध्यक्ष पुनीत केरेहळ्ळी याचाही समावेश आहे.

- Advertisement -

त्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवसकुमार यांनी घटनास्थळाची पाहाणी केली. काही जण राज्यात अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यांना काँग्रेसचे स्वतंत्रता मार्च पाहवत नाही, अशी टीका त्यांनी केली. त्यांनी कर्नाटकातील बोम्मई सरकारवर देखील निशाणा साधला. बोम्मई सरकारने वृत्तपत्रांमध्ये जाहिरात दिली होती. त्यात स्वातंत्र्यलढ्यात अग्रस्थाी असलेल्यांची यादी दिली होती आणि त्यात पहिले पंतप्रधान जवारहलाल नेहरू यांचे नाव वगळण्यात आले आहे. त्याला काँग्रेसने आक्षेप घेत मुख्यमंत्री बसवराज बोम्मई हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे गुलाम असल्याचा आरोप केला आहे.

मंगळुरूतही वाद
मंगळुरु पालिकेने सुरतकल चौकाला वीर सावकर यांचे नाव देण्याचा निर्णय घेतला होता. त्याबाबतचा प्रस्ताव देखील पालिकेत मंजूर झाला होता. त्यामुळे तिथे वीर सावरकर यांच्या नावाचा बॅनर लावण्यात आला होता, पण तोही नंतर हटविण्यात आला.

Manoj Joshi
Manoj Joshihttps://www.mymahanagar.com/author/mjoshi/
प्रिंट, चॅनल आणि डिजिटल या तिन्हीचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -