घरमनोरंजनहिंदूंना अचानक जाग आली...'लाल सिंह चड्ढा'च्या वादावर मुकेश खन्नाने दिली प्रतिक्रिया

हिंदूंना अचानक जाग आली…’लाल सिंह चड्ढा’च्या वादावर मुकेश खन्नाने दिली प्रतिक्रिया

Subscribe

मागील अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर या चित्रपटांवर बहिष्कार टाकण्याची मागणी केली जात आहे. सध्या सगळीकडे याबाबत अनेक बॉलिवूड कलाकारांच्या अनेक प्रतिक्रिया समोर येत आहेत. याचंदरम्यान, अभिनेते मुकेश खन्ना यांनी आपली प्रतिक्रिया मांडली आहे.

2022 मध्ये हिंदी चित्रपटांसाठी फारसं चांगलं नाही. काही मोजके चित्रपट सोडले तर अनेक दिग्गज कलाकारांचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाई करण्यात अयशस्वी झाले आहेत. नुकत्याच काही दिवसांपूर्वी आमीर खान आणि करीना कपूरचा ‘लाल सिंह चढ्ढा’ चित्रपट प्रदर्शित झाला आहे. परंतु चित्रपट प्रदर्शित होऊन पाच दिवस होऊनही या चित्रपटाने 50 कोटींची कमाई देखील केलेली पाहायला मिळत नाही. इतकंच नाही तर अक्षय कुमारच्या ‘रक्षाबंधन’ चित्रपटाने देखील अजून 35 कोटींची कमाई सुद्धा केलेली नाही.

मागील अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर या चित्रपटांवर बहिष्कार टाकण्याची मागणी केली जात आहे.
सध्या सगळीकडे याबाबत अनेक बॉलिवूड कलाकारांच्या अनेक प्रतिक्रिया समोर येत आहेत. याचंदरम्यान, अभिनेते मुकेश खन्ना यांनी आपली प्रतिक्रिया मांडली आहे.

- Advertisement -

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये मुकेश खन्ना यांना विचारण्यात आलं की, आमीर खानचा लाल सिंह चड्ढा फ्लॉप होण्याचं कारण विचारलं. या प्रश्नाचं उत्तर देत मुकेश खन्ना म्हणाले की, चित्रपटावरून होणारे वाद हे काही पहिल्यांदा होत नाहीत. याआधी सुद्धा अनेक चित्रपटांवरून वाद झाले आहेत. परंतु हे पहिल्यांदाच होत आहे की, एका जुन्या विधानावरून इतक्या दिवसांनी त्यावर वाद होत आहे. त्यानंतर ते म्हणाले की, काही सो कॉल्ड दिग्दर्शक, निर्मात्यांनी हा एक सोप्पा मार्ग निवडला आहे. कोणत्याही धर्मावर निशाणा ठेवायचा मग त्यावर वाद निर्माण होतो. यामुळे चित्रपटाचा फायदा होतो. जे चुकिच आहे. या बहिष्कारामुळे बॉलिवूडला खूप नुकसान होत आहे. जे खूप घातक आहे.

हिंदूंना अचानक जाग आली
यावेळी मुकेश खन्ना म्हणाले की, आमीर खानच्या वक्तव्यानंतर त्याचा दंगल चित्रपट देखील प्रदर्शित झाला होता, मात्र हा चित्रपटाने चांगली कमाई केली होती. आता असं वाटतं की, अचानक हिंदू लोकांना जाग आली आहे. प्रत्येक चित्रपट बनवण्यासाठी खपू मेहनत घ्यावी लागते. खूप पैसा खर्च करावा लागतो. जेव्हा चित्रपट फ्लॉप होतो, तेव्हा खूप वाईट वाटतं.


हेही वाचा :जेव्हा तुमचा चित्रपट ईमानदार असतो, तेव्हा तो यशस्वी होतोच…विवेक अग्निहोत्रींचं ट्वीट चर्चेत

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -