घरदेश-विदेशचार वर्षांवरील मुलांनाही हेल्मेट घालणे अनिवार्य; नियम मोडल्यास मोठा दंड

चार वर्षांवरील मुलांनाही हेल्मेट घालणे अनिवार्य; नियम मोडल्यास मोठा दंड

Subscribe

या नियमाचं उल्लंघन केल्यास मुलांच्या पालकांना मोठ्या रकमेचा दंड होऊ शकतो. याच संदर्भांत वाहतुकीचे नियम काय आहेत तेच जाणून घेऊ.

काही महिन्यांपूर्वीच भारत सरकारकडून घोषणा करण्यात आली होती की नऊ महिने ते चार वर्षे वयोगटातील मुलांना दुचाकीवर बसवताना हेल्मेट घालणे गरजेचे आहे. मात्र असे असूनही या नियमाची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही. मोटार वाहन कायद्यानुसार चार वर्षांवरील मुलांनी दुचाकीवरून प्रवास करताना हेल्मेट घालणे बंधनकारक आहे. असा नियमच आहे. त्यामुळे या नियमाचं उल्लंघन केल्यास मुलांच्या पालकांना मोठ्या रकमेचा दंड होऊ शकतो. याच संदर्भांत वाहतुकीचे नियम काय आहेत तेच जाणून घेऊ.

हे ही वाचा – काँग्रेसचा नवा अध्यक्ष कोण? राहुल-प्रियंकाचा पत्ता कट, ‘या’ नेत्याची लागणार वर्णी?

- Advertisement -

चार वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांना आता दुचाकीवरुन प्रवास करताना हेल्मेट घालणे आता बंधनकारक असणार आहे. असं केंद्र सरकारने सांगितले आहे. केंद्रीय मोटार वाहन दुरुस्ती विधेयक 2019 च्या कलम 129 मध्ये तासंदर्भात तरतूद सुद्धा करण्यात आली आहे. जर कोणी हा नियम मोडला तर त्याला किमान 1000 रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. किंवा ड्रायव्हिंग लायसन्सही तीन महिन्यांसाठी जप्त केले जाऊ शकते.

हे ही वाचा – मुंद्रा पोर्ट ड्रग्ज प्रकरणात NIAची मोठी कारवाई; २९८८ किलो हेरॉइन जप्त

- Advertisement -

काय आहेत नियम 

– रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने CMVR 1989 च्या नियम 138 मध्ये दुरुस्ती केली आहे ज्यामध्ये चार वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी दुचाकीवरून जाताना या सुरक्षा तरतुदी समाविष्ट केल्या आहेत. या तरतुदीनुसार, चार वर्षांच्या मुलांनी सरकारने ठरवून दिलेल्या सुरक्षा नियमांचे पालन करून क्रॅश हेल्मेट घालणे बंधनकारक असेल.

हे ही वाचा – भारताचा ऐतिहासिक वारसा स्कॉटलंडकडून मिळणार परत; एकूण 7 कलाकृतींचा समावेश

– रस्त्यांवर प्रवासादरम्यान जे अपघात होतात ते अपघात कमी करण्यासाठी भारत सरकार प्रयत्नशील आहे. याच संदर्भात सरकार एक नवीन नियम करणार आहे, ज्यामध्ये सुरक्षेसाठी लहान मुलांनी सेफ्टी हार्नेस घालणे अनिवार्य आहे. सेफ्टी हार्नेस हा मुलाने परिधान केलेला बनियान आहे, जो ड्रायव्हरने परिधान केलेल्या बनियान आणि खांद्याच्या लूपला जोडलेल्या पट्ट्यांना जोडलेला असतो.

हे ही वाचा – शेअर बाजार गडगडला, दोन दिवसांत १७०० अंकांची घसरण

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -