घरदेश-विदेशधावत्या कारमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार!

धावत्या कारमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार!

Subscribe

मंगळवारी मध्यरात्री पावणेदोनच्या सुमारास एका धावत्या कारमध्ये तीन नराधमांनी पीडित मुलीवर सामुहिक बलात्कार केला.

एकीकडे महिलांच्या सुरक्षिततेच्या मुद्द्यावरुन देशभरात ओरड होत असताना, दुसरीकडे आल्या दिवशी महिलांवरील अत्याचारांच्या घटना समोर येत आहेत. महिलांसोबत लैंगिक अत्याचार करणं, भर रस्त्यात त्यांची छेड काढणे आणि महिलांना उपभोगाची वस्तू समजून त्यांच्यावर होणारे बलात्कार या विकृत घटना दिवसागणीक वाढत चालल्या आहेत. अशातच आता पुन्हा एकदा बलात्काराची धक्कादायक घटना समोर आली आहे. राजधानी दिल्लीमध्ये एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला आहे. मंगळवारी रात्री उशीरा दिल्लीतील नरेला परिसरात धावत्या कारमध्ये एका १२ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी ३ जणांना अटक करण्यात आली आहे. रवी कुमार, मोहित आणि विनोद अशी या तीन आरोपींची नावं असून, तिघेही नराधम पोलीस कस्टडीत आहे.

मंगळवारी मध्यरात्री पावणेदोनच्या सुमारास नरेला परिसरातून जाणाऱ्या एका संशयित कारचा पोलिसांनी पाठलाग केला. पोलिसांनी ती कार रोखली आणि चेकिंग करायला सुरुवात केली. यादरम्यान, त्यांना कारच्या बॅक सीटवर पीडित मुलीसह तीन युवक दिसले. कारमधील पीडित मुलीने या तिघांनी आपल्यावर बलात्कार केल्याचा आरोप केला. आरोपी आणि पीडित मुलगी हे एकाच परिसरात राहणारे आहेत. ज्यावेळी पोलिसांनी घटनास्थळारून आरोपींना अटक करण्याचा प्रयत्न केला त्यावेळी दोघंजण ताब्यात आले मात्र एक आरोपी तिथून पसार झाला. त्यानंतर पोलिसांनी काहीवेळ त्याचा पाठलाग करुन त्याला ताब्यात घेतले. दरम्यान, तिनही संशयित आरोपींना सध्या न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

- Advertisement -

राजधानी दिल्लीमध्ये आजवर बलात्काराच्या आणि लैंगिक अत्याचाराच्या अनेक घटना घडल्या आहेत. दिल्लीमध्ये घडलेलं ‘निर्भया’सारखं भयानक आणि विकृत प्रकरण आजही लोकांच्या मनात ताजं आहे. देशाची राजधानी असलेल्या दिल्लीमध्ये अशाप्रकारे वारंवार महिलांवर अत्याचार होणं ही खूप गंभीर आणि खेदजनक बाब आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -