घरलाईफस्टाईलकोलेस्ट्रोल कमी करण्यासाठी लेमनग्रास ठरते प्रभावी; 'हे' आहेत फायदे

कोलेस्ट्रोल कमी करण्यासाठी लेमनग्रास ठरते प्रभावी; ‘हे’ आहेत फायदे

Subscribe

लेमनग्रास शरीरात कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रणात राखण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतात. एवढाच नाही तर लेमनग्रास तणाव, चिंता कमी करण्यासाठी सुद्धा फायदेशीर ठरते. कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी लेमनग्रास कसे फायदेशीर आहे ते जाणून घेऊ.

सध्या बदलती जीवनशैली कामाच्या आणि खाण्याच्या वेळा या सगळ्यांमध्ये बदल झाला आहे. त्याचा परिणाम शरीरावर सुद्धा होतो. त्यामुले कोलेस्ट्रोलचा त्रास सुद्धा होतो लेमनग्रास ही कोलेस्ट्रोल कमी करण्यासाठी खूप प्रभावी मनाली जाते. लेमनग्रास एक औषधी वनस्पती आहे, तिचा सुगंध लिंबासारखा असतो, त्यामुळे त्याला लेमनग्रास म्हणतात. व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, फोलेट, फॉलिक ऍसिड, मॅग्नेशियम, जस्त, तांबे, लोह, पोटॅशियम, फॉस्फरस आणि कॅल्शियम लेमनग्रास मध्ये मोठ्या प्रमाणात असते. याच्या सेवनाने अनेक आरोग्यदायी फायदे होतात. लेमनग्रासमध्ये अँटिऑक्सिडेंट, अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटीसेप्टिक गुणधर्म देखील असतात. हे शरीरात कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रणात राखण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतात. एवढाच नाही तर लेमनग्रास तणाव, चिंता कमी करण्यासाठी सुद्धा फायदेशीर ठरते. कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी लेमनग्रास कसे फायदेशीर आहे ते जाणून घेऊ.

हे ही वाचा – तुम्हीसुद्धा फेकून देताय ‘या’ बिया? आरोग्यासाठी आहेत फायदेशीर

- Advertisement -

लेमनग्रास पासून बनविलेलया चहाचे अनेक आरोग्य फायदे आहेत. लेमनग्रास चहा मुक्त रॅडिकल्सशी लढण्यास मदत करतो, ज्यामुळे पोटात होणारी जळजळ कमी होते. रोज सकाळी याचे सेवन केल्याने शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहते. उलटी आणि पोटदुखी यांसारख्या समस्यांपासूनही आराम मिळतो. लेमन टी वजन सुद्धा नियंत्रणात राहते. मध मिसळून लेमनग्रास चहा प्यायल्याने वजन झपाट्याने कमी होण्यास मदत होते.

हे ही वाचा – रोजच्या भाजीला द्या एक वेगळा ट्विस्ट; ‘या’ पद्धतीने द्या फोडणी नावडती भाजीही होईल आवडती

- Advertisement -

लेमनग्रास चहा कसा बनवायचा

लेमनग्रास चहा बनवण्यापूर्वी लेमनग्रास कापून चांगले स्वच्छ धुवून घ्या. एका पातेल्यात पाणी घेऊन ते उकळा. पाण्याला उकळी आल्यानंतर त्यात चिरलेली लेमनग्रास घाला. 5 ते 7 मिनिटे चांगले उकळल्यानंतर ते एका कपमध्ये गाळून घ्या. आता त्यात लिंबाचा रस, सैंधव मीठ आणि मध मिसळून ते एकत्र करून प्या.

हे ही वाचा –  Receipe : बाप्पाच्या प्रसादासाठी मूग डाळीपासून बनवा पौष्टिक मोदक

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -