घरताज्या घडामोडीजम्मूमधील किश्तवाडमध्ये भीषण अपघात; आठ जणांचा मृत्यू

जम्मूमधील किश्तवाडमध्ये भीषण अपघात; आठ जणांचा मृत्यू

Subscribe

जम्मू विभागातील किश्तवाड जिल्ह्यात झालेल्या भीषण अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. सर्व जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

जम्मू विभागातील किश्तवाड जिल्ह्यात झालेल्या भीषण अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. सर्व जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (jammu seven people died in a tragic accident in kishtwar tata sumo fell into a deep gorge)

मिळालेल्या माहितीनुसार, किश्तवार जिल्ह्यातील बुंदा छत्रु चांगा परिसरात टाटा सुमो या गाडीच्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. यामुळे टाटा सुमो थेट खोल दरीत कोसळली. त्यामुळे या गाडीतील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. तसेच, काही वेळाने तिघांचा मृत्यू झाला.

- Advertisement -

अपघातग्रस्त गाडीतील अन्य तीन जणांना स्थानिक लोक, पोलीस आणि लष्कराच्या मदतीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी स्थानिक पोलिसांनी धाव घेतली.

याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नूर हुसेन, मोहम्मद अकबर, मोहम्मद शरीफ, फरीद हुसेन, नझीर अहमद, बशीर अहमद, फरीद हुसेन आणि १६ वर्षीय नुसरत खातून अशी या भीषण अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. मंजूर अहमद, खातून आणि अख्तर हुसेन अशी जखमींची नावे आहेत.

- Advertisement -

दरम्यान, राज्याचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी या दुःखद अपघाताबद्दल शोक व्यक्त केला आहे. या दु:खद दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीमुळे मला खूप दुःख झाले आहे, असे ते म्हणाले. दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांप्रती माझ्या संवेदना. सर्व जखमींना चांगले उपचार देण्याचे निर्देश त्यांनी स्थानिक प्रशासनाला दिले आहेत.


हेही वाचा – मुसळधार पावसाचा बंगळुरूला फटका; पूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -