घरमहाराष्ट्रदेशातील न्यायव्यवस्था उत्तम रहावी, शेतकरी आणि सर्वसामान्यांना दिलासा मिळावा; जयंत पाटलांचं गणरायाकडे...

देशातील न्यायव्यवस्था उत्तम रहावी, शेतकरी आणि सर्वसामान्यांना दिलासा मिळावा; जयंत पाटलांचं गणरायाकडे साकडं

Subscribe

जर एखादा पक्ष या परिस्थितीवर राजकीय पोळी भाजत असेल तर अवघड आहे असे म्हणत जयंत पाटील यांनी भाजपचे(bjp) नाव न घेता टोला लगावला.

मुंबई: आज गणेश चतुर्थीच्या(ganesh chaturthi) निमित्ताने सर्वत्रच आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण आहे. देशातील न्यायव्यवस्था उत्तम रहावी, अतिवृष्टीमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळावा तसेच मध्यमवर्गीयांच्या मानगुटीवर बसलेला महागाईचा राक्षस नष्ट व्हावा असे साकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे(ncp) प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील(jayant patil)  यांनी गणरायाला घातले आहे.

हे ही वाचा –  महाराष्ट्रातील, देशातील सर्व विघ्न विघ्नहर्त्याने दूर करावेत, देवेंद्र फडणवीसांचं बाप्पाला साकडं

- Advertisement -

कोरोनाचे सावट कमी झाल्यानंतर आज दोन वर्षानंतर राज्यभरात गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील(jayant patil) यांच्या निवासस्थानीही गणरायाचे आगमन झाले. त्यावेळी माध्यमांशी संवाद साधताना बोलत होते. आमच्या सरकारने कधीही कोणत्याही सणांवर बंदी आणली नाही. कोरोना आटोक्यात आणण्यासाठी काही निर्बंध लावले होते. आज कोरोना कमी झाला आहे म्हणून निर्बंध हटवले गेले आहेत. जर एखादा पक्ष या परिस्थितीवर राजकीय पोळी भाजत असेल तर अवघड आहे असे म्हणत जयंत पाटील यांनी भाजपचे(bjp) नाव न घेता टोला लगावला.

हे ही वाचा – न्यायालयाच्या निर्णयाने राज्य सरकारला चपराक : आ. खडसे

- Advertisement -

विदर्भातील लोकांनी मला सांगितले की अतिवृष्टी झालेल्या भागात कवडीचीही मदत झालेली नाही. सरकारने घोषणा तर केली पण मदत अजून पोहोचली नाही. वेळेवर मदत मिळत नसेल तर त्या मदतीला काय अर्थ ? असा संतापही जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

हे ही वाचा – ताजमहालचे नाव होणार आता तेजो महालय? आग्रा महापालिकेत सादर होणार प्रस्ताव

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -