घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रन्यायालयाच्या निर्णयाने राज्य सरकारला चपराक : आ. खडसे

न्यायालयाच्या निर्णयाने राज्य सरकारला चपराक : आ. खडसे

Subscribe

नाशिक : जळगाव जिल्हा दूध संघाच्या संचालक मंडळावर प्रशासक नेमण्यात आले होते. परंतु हे प्रशासक मंडळ बरखास्त करण्यात आले आहे. दूध संघातील वाद न्यायालयात पोहोचल्यानंतर न्यायालय काय निकाल देणार याकडे लक्ष लागले होते. अखेर न्यायालयाने संचालकांच्या बाजूने निर्णय देत राज्य सरकारने नियुक्त केलेले प्रशासक मंडळ अवैध ठरवले असून, ही राज्य सरकारला चपराक असल्याचे आमदार एकनाथ खडसे यांनी सांगितले.

खडसे नाशिक येथे आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. खडसे म्हणाले, न्यायालयाने संचालक मंडळाचे म्हणणे मान्य करून प्रशासक मंडळ अवैध असून ते बरखास्त करण्यात यावे, असा निकाल दिला असून संचालक मंडळ पूर्ववत कामावर आल्याचे त्यांनी सांगितले. राज्यसरकारने बेकायदेशीर प्रशासक मंडळ नियुक्त केले, खोट्या चौकशी केल्या त्याविरोधात न्याय मिळाल्याचेही त्यांनी सांगितले. शेवटी निर्णय पंकजाताईंचा ः पंकजाताई अस्वस्थ आहेत अशी चर्चा आहे. त्यामुळे त्यांना अमोल मिटकरींनी आमंत्रण दिले. शेवटी निर्णय त्यांनी घ्यायचा आहे. एवढ्या वर्षापासून पक्षकार्य करत आहेत. त्या असा निर्णय घेतील वाटत नाही, असेही ते म्हणाले.

- Advertisement -

50 आमदार फुटतील असे वाटले नव्हते

शिवसेनेतून फुटून भाजपसोबत युती केलेले 50 आमदार फुटतील असे वाटले नव्हते. परंतु, ते फुटून गेल्याने राज्यातील राजकारणात काहीही घडू शकते हे स्पष्ट झाले. दरम्यान, भाजपमध्ये निष्ठावंताना अजिबात स्थान नाही. ज्यांनी भाजप घडवण्यासाठी आपली हयात घालवली त्यांना भाजपमध्ये स्थान नाही. जे नवीन आले आहेत त्यांना चांगली खाती मिळत असल्याचे एकनाथ खडसे म्हणाले. तसेच, भाजप आणि मनसे युती झाल्यास आश्चर्य वाटण्यासारखे काहीही नसल्याचे ते म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -