घरमुंबईमुंबईत रुळांवर लोखंडी ड्रम ठेवून घातपाताचा प्रयत्न, मोटरमनच्या सतर्कतेमुळे संभाव्य विघ्न टळले

मुंबईत रुळांवर लोखंडी ड्रम ठेवून घातपाताचा प्रयत्न, मोटरमनच्या सतर्कतेमुळे संभाव्य विघ्न टळले

Subscribe

मुंबई – मोटरमनच्या सतर्तकेमुळे रेल्वेचा मोठा अपघात टळला आहे. सॅण्डहर्स्ट रोड ते भायखळा दरम्यान रुळांवर लोखंडी ड्रम पडले होते. मोटनमनच्या वेळीच लक्षात आल्याने त्यांनी लागलीच इमरजन्सी ब्रेक दाबला त्यामुळे पुढील अनर्थ टळला. दरम्यान, याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

१ सप्टेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून खोपोलीसाठी दुपारी ३ वाजून १० मिनिटांनी सुटणारी लोकल सॅण्डहर्स्ट रोडला पोहोचली तेव्हा मोटरमन अशोक शर्मा यांना रुळांवर दगड आणि लोखंडी ड्रम दिसले. त्यामुळे त्यांनी आपत्कालीन ब्रेक दाबल्याने मोठा आवाज होत लोकल एकदम थांबली, अशी माहिती मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली.

- Advertisement -

लोकल थांबताच शर्मा हे रुळांवर उतरले आणि त्यांनी पाहणी केली असता त्यांना ड्रम आणि काही दगडं सापडली. त्यामुळे, मोटरमनने ब्रेक दाबला नसता तर मोठा अनर्थ घडला असता. प्रवाशांच्या मदतीने ड्रम बाजूला करण्यात आले. यामुळे लोकलला भायखळा येथे पोहोचण्यास पाच मिनिटे उशीर झाला, मात्र कल्याण स्थानकात लोकल अगदी वेळेत पोहोचली अशी माहितीही अधिकाऱ्यांनी दिली. याप्रकरणाची गंभीर दखल घेत अज्ञांताविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

दरम्यान, रुळांवर वस्तू फेकण्याचे प्रकार काही नवे नाहीत. काही वर्षांपूर्वी हार्बर मार्गावरील सॅण्डहर्स्ट रोडच्या रुळावंरही लोखंडी रॉड टाकण्याचा प्रकार झाला होता. स्थानिक गदुर्ल्यांकडून असे प्रकार केले जातात.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -