घरदेश-विदेशपतंजली तूपवरील चाचणी भारतात अयशस्वी मग ऑस्ट्रेलियात पास कशी? बाबा रामदेवांचा सवाल

पतंजली तूपवरील चाचणी भारतात अयशस्वी मग ऑस्ट्रेलियात पास कशी? बाबा रामदेवांचा सवाल

Subscribe

नवी दिल्ली : योगगुरू स्वामी बाबा रामदेव यांनी पतंजली समुहाच्या कंपनीच्या विस्ताराबाबत एक मोठी घोषणा केली आहे. पत्रकार परिषदेत बाबा रामदेव यांनी येत्या पाच वर्षात पतंजली समूहाच्या चार कंपन्यांसाठी आयपीओ आणण्याची योजना जाहीर केली आहे. कंपनीने एका निवदेनात म्हटले की, आम्ही पाच वर्षांत चार आयपीओ आणून पतंजली समूहाच्या पाच कंपन्यांची लिस्ट करण्याची तयारी करत आहोत.

कंपनीने पतंजली फूड्सनंतर पतंजली आयुर्वेद, पतंजली वेलनेस, पतंजली मेडिसिन आणि पतंजली लाइफस्टाइल या इतर चार कंपन्यांचे आयपीओ लॉन्च करण्याचे ध्येय असल्याचे म्हटले आहे. सध्या पतंजली फूड्स भारतीय शेअर बाजारात लिस्टेड आहे. यासोबतच कंपनीने 5 लाख कोटी रुपयांचे बाजार मूल्याचे लक्ष्य गाठण्यासाठी अॅक्शन प्लॅन तयार केला आहे.

- Advertisement -

यातच बाबा रामदेव यांनी आज FSSAI वर गंभीर आरोप केला आहे. पतंजलीचे तूप जगभर विकले जाते आणि त्याच्या गुणवत्तेवर कोणताही प्रश्न उपस्थित करण्यात आले नाही पण भारतात पतंजली तूपावरील चाचणीत अपयशी ठरते. यावरून पतंजलीविरोधात षडयंत्र रचले जात असल्याचा आरोप बाबा रामदेव यांनी केला आहे.

पतंजली फूड्सची मोठी कमाई

बाबा रामदेव यांच्या नेतृत्वाखालील पतंजली फूड्स ही सध्या स्टॉक मार्केटमध्ये लिस्टेड असलेली एकमेव कंपनी आहे आणि ती आपल्या गुंतवणूकदारांना प्रचंड नफा कमवून देत आहे. बाबा रामदेव यांच्या नेतृत्वाखालील पतंजली आयुर्वेदने रुची सोयाच्या रिझोल्यूशन प्रक्रियेअंतर्गत 2019 मध्ये 4,350 कोटी रुपयांना विकत घेतली होती. ही कंपनी आधीच शेअर बाजारात लिस्ट झाली होती.

- Advertisement -

दरम्यान, त्याच वर्षी 2022 मध्ये बाबा रामदेव यांनी कंपनीचे नाव रुची सोया बदलून पतंजली फूड्स केले. पतंजली फूड्सच्या स्टॉकची किंमत आठवड्यातून दर आठवड्याला वाढत आहे.

खाद्यतेल बनवणाऱ्या देशातील आघाडीच्या कंपनी पतंजली फूड्सच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना कसे श्रीमंत केले आहे, याचा अंदाज त्यांच्या किमती वर्षानुवर्षे वाढल्याच्या प्रवासावरून लावता येतो. सप्टेंबर 2017 मध्ये त्याच्या शेअरची किंमत सुमारे 26 रुपये होती. तर, गुरुवारी दिवसभराच्या व्यवहाराअखेर पतंजली फूड्सचे शेअर 1345 रुपयांच्या पातळीवर बंद झाला. सध्या पतंजली फूड्सचे मार्केट कॅप (Mcap) सुमारे 50,000 कोटी रुपये आहे.


आदित्य ठाकरेंच्या Z सुरक्षेत निष्काळजीपणा; सरकारी गाड्यांऐवजी खासगी वाहनांमधून प्रवास


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -