घरक्रीडाटी-20 मालिकेत विराटला दोन रेकॉर्ड करण्याची संधी, द्रविडचाही विक्रम मोडणार?

टी-20 मालिकेत विराटला दोन रेकॉर्ड करण्याची संधी, द्रविडचाही विक्रम मोडणार?

Subscribe

आशिया चषकात भारताचा माजी कर्णधार आणि रणमशिन विराट कोहलीने उत्कृष्ट कामगिरी केली आहे. विराट कोहली चांगल्या फॉर्ममध्ये परतला आहे. त्यामुळे आता टी-20 मालिकेत विराट कोहलीला दोन मोठे रेकॉर्ड करण्याची संधी आहे. तर या रेकॉर्डमुळे तो भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडचाही रेकॉर्ड मोडू शकतो. त्यामुळे टी-20 मालिकेत त्याला महत्त्वाचा टप्पा गाठण्याची संधी उपलब्ध झाली आहे.

ऑस्ट्रेलियात ऑक्टोबरमध्ये रंगणाऱ्या टी-20 विश्वचषकापूर्वी भारताला ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मायदेशात तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळायची आहे. आतंरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा विराट कोहलीच्या आहेत. फंलदाजांच्या यादीत विराट कोहली 24 हजार 2 धावांसह सातव्या क्रमांकावर आहे. त्यामुळे कोहलीने जर 207 धावा केल्या तर तो राहुल द्रविडचा विक्रम मोडू शकतो.

- Advertisement -

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये राहुल द्रविड सहाव्या क्रमांकावर असून द्रविडनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 509 सामन्यात 24 हजार 208 धावा केल्या आहेत. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरही अव्वल स्थानी आहे. सचिन तेंडुकरच्या नावावर 34 हजार 357 धावांची नोंद आहे. त्यामुळे विराट दोन मोठे रेकॉर्ड करणार का, याकडे क्रिकेट प्रेमींच लक्ष लागलं आहे.

कोहलीनं टी-20 क्रिकेटमध्ये आतापर्यंत 349 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये 40.37 च्या सरासरीनं 10 हजार 902 धावा केल्या आहेत. भारताचा कर्णधार रोहित शर्माच्या नावावर टी-20 क्रिकेटमध्ये 10 हजार 470 धावांची नोंद आहे. तसेच भारतीय फलंदाजांच्या यादीत तो दुसऱ्या क्रमांकावर आहे.

- Advertisement -

हेही वाचा : चेंडूच्या आघाताने टीम इंडियाचा क्रिकेटपटू जमिनीवर कोसळला, मैदानातच बोलावावी लागली अ‍ॅम्ब्युलन्स


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -