घरमुंबईनवरा निघाला 'चोर', पोलिसांनी केली अटक

नवरा निघाला ‘चोर’, पोलिसांनी केली अटक

Subscribe

सोमवारी सकाळी ९च्या दरम्यान अमर महल जंक्शनकडून एक महिला आपल्या मुलीला घेऊन जात होती. त्यावेळी बाईकवर अजय आणि अल्ताफ होते. त्यांनी या महिलेच्या हातातून मोबाईल हिसकावून पळ काढला.

लग्नानंतर ठेवलेल्या पार्टीत नाचत आनंद साजरा करत असताना अचानक नवरा मुलगाच गायब झाला. नवरा गेला कुठे याचा शोध नातेवाईक लावत असतानाच पोलीस या तरुणाला बेड्या घालून नेताना दिसले आणि सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकून गेली. कारण अगदी काहीच तासांपूर्वी लग्न केलेला हा तरुण आणि त्याचा जिगरी मित्र चोर असल्याचे सगळ्यांना कळले. अगदी सिनेमात घडावा असा प्रसंग मुंबईत घडला. शिवाजीनगर परीसरात हा सगळा प्रकार घडला असून अजय धोटे असे या चोराचे नाव आहे.  त्याच्यासोबत त्याचा  साथीदार अल्ताफ मिर्झा याला देखील पोलिसांनी अटक केली आहे.

वाचा- अरेच्च्या! पोलिसाच्या घरातच चोरी

नेमकं काय झालं ?

सोमवारी सकाळी ९च्या दरम्यान अमर महल जंक्शनकडून एक महिला आपल्या मुलीला घेऊन जात होती. त्यावेळी बाईकवर अजय आणि अल्ताफ होते. त्यांनी या महिलेच्या हातातून मोबाईल हिसकावून पळ काढला. ही महिला काही आरडाओरड करणार इतक्यात हे चोर पसार झाले. या महिलेने या संदर्भात पोलिसांत तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी याचा तपास घेतल्यानंतर ही सगळी घटना कॅमेऱ्यात कैद झाल्याचे कळले. पोलिसांनी अधिक तपास केल्यानंतर अशाच प्रकारे आणखी काही चोऱ्या याच पद्धतीने करण्यात आल्याचे कळले. पोलिसांना बाईकवरील नंबर कळू नये म्हणून त्यावरील नंबर झाकण्यात आला होता. या चोरीसाठी वापरण्यात आलेली २००सीसीची बाईकही पोलिसांना अन्य केसमध्ये वर्णन केल्याप्रमाणे होती. सीसीटीव्ही फुटेजवरुन या दोघांना अखेर पोलिसांनी शोधून काढले.

- Advertisement -
हे माहित आहे का? –रेल्वेच्या एसी डब्यातून १४ कोटींचे टॉवेल्स,उशा, चादरींची चोरी!

अशी केली अटक?

पोलीस या घटनेतील चोर अजय धोटे आणि अल्ताफ मिर्झा यांचा शोध घेण्यासाठी त्यांनी गोवंडी आणि शिवाजी नगर परीसरात शोध घेतला. त्यावेळी हे चोर शिवाजी नगर परीसरात राहत असल्याचे पोलिसांना कळाले. त्यांना अटक करण्यासाठी पोलीस शिवाजीनगर येथे आले. त्यावेळी अजयचे काहीच तासांपूर्वी लग्न झाल्याचे कळले. वांद्रे कोर्टात त्याने लग्न केले होते. नुकताच तो नव्या नवरीला घेऊन घरी येत होता. त्याच्या बायकोच्या स्वागतासाठी वरात काढण्यात आली होती. या वरातीत तो देखील नाचत होता. पण तितक्यात पोलीस आले. त्यांनी अजय आणि अल्ताफला अटक केली.  अशाच पद्धतीने आणखी काही चोऱ्या केल्याची  कबूली त्यांनी पोलिसांना दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -