घरक्राइमचंदीगडनंतर IIT बॉम्बेमध्ये एमएमएस घोटाळा! वॉशरुमच्या खिडकीतून विद्यार्थिनींने आक्षेपार्ह व्हिडिओ

चंदीगडनंतर IIT बॉम्बेमध्ये एमएमएस घोटाळा! वॉशरुमच्या खिडकीतून विद्यार्थिनींने आक्षेपार्ह व्हिडिओ

Subscribe

चंदीगड विद्यापीठातील एका विद्यार्थीनीने गर्ल्स हॉस्टेलमधील इतर विद्यार्थिनींचे अश्लील व्हिडीओ बनवल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले. या प्रकरणी अद्यापही तपास सुरु आहे. या प्रकरणातील गुंता अद्याप सुटला नसताना मुंबईतील प्रतिष्ठित इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT BOMBAY) येथेही अशाच प्रकारची घटना समोर आली आहे. IIT बॉम्बे येथील एका वसतिगृहातील विद्यार्थीनीने वॉशरुमच्या खिडकीतून आक्षेपार्ह व्हिडीओ बनवल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी आयआयटी बॉम्बेमधील एका कॅन्टीन कर्मचाऱ्याला अटक केली आहे. पोलिसांनी आरोपीचा मोबाईल ताब्यात घेत तपासला आहे. मात्र त्याच्या मोबाईलमध्ये कोणताही व्हिडीओ आढळला नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी आयआयटी बॉम्बेच्या एका विद्यार्थीनीने पवई पोलिसांशी संपर्क साधत आरोप केला की, रविवारी रात्री वसतीगृहातील 10 (H10) च्या वॉशरुममध्ये अंघोळ करताना एक कॅन्टीन कर्मचाऱ्याने तिचा व्हिडीओ रेकॉर्ड केला होता. पोलिसांनी या प्रकरणात आरोपी कॅन्टीन कर्मचाऱ्याविरोधात कलम 354C (दृश्यता) अंतर्गत एफआयआर नोंदवला आहे.

- Advertisement -

वरिष्ठ पोलिस निरीक्षक बुधन सावंत यांनी सांगितले की, रविवारी रात्री विद्यार्थीनीने एच 10 वॉशरूमच्या खिडकीतून व्हिडिओ रेकॉर्ड केल्याबद्दल सांगितले. याबाबत विद्यार्थीनीने वसतिगृह परिषद व अधिकाऱ्यांनाही माहिती दिली. यानंतर आयआयटी बॉम्बेच्या अधिकाऱ्यांनी कॅन्टीन कर्मचाऱ्यांचे फोन तपासले. पोलिसांनी सांगितले की, एफआयआर दाखल झाल्यानंतर आरोपी कॅन्टीन कर्मचाऱ्याला चौकशीसाठी बोलावण्यात आले. मात्र चौकशीनंतर त्याला सोडून देण्यात आले.

आयआयटी बॉम्बेचे डीन (विद्यार्थी व्यवहार) प्राध्यापक तपनेंदू कुंडू यांनी सांगितले की, विद्यार्थ्याच्या तक्रारीनंतर संस्थेने तत्काळ कारवाई केली आणि बाहेरून बाथरूमकडे जाणारा रस्ता सील करण्यात आला आहे. एच 10 च्या तपासणीनंतर महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे आणि लाईट लावण्यात आली आहे. रात्रीचे कॅन्टीन पुरुष कर्मचारी चालवतात. विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी या कॅन्टीनमध्ये केवळ महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


SBI ची ग्राहकांसाठी मोठी बातमी; बँकेकडून मार्चपर्यंत उपलब्ध होणार ‘या’ सुविधा

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -