घरताज्या घडामोडीमुंबई महापालिका कर्मचाऱ्यांना यंदा २२ हजार ५०० रुपये बोनस

मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांना यंदा २२ हजार ५०० रुपये बोनस

Subscribe

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर मुंबई महानगरपालिका कर्मचाऱ्यांना यंदाच्या दिवाळीसाठी २२ हजार ५०० रुपये इतका बोनस राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने जाहीर करण्यात आला आहे. गतवर्षी पालिका कर्मचाऱ्यांना उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना २० हजार रुपये बोनस देण्यात आला होता.

मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर मुंबई महानगरपालिका कर्मचाऱ्यांना यंदाच्या दिवाळीसाठी २२ हजार ५०० रुपये इतका बोनस राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने जाहीर करण्यात आला आहे. गतवर्षी पालिका कर्मचाऱ्यांना उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना २० हजार रुपये बोनस देण्यात आला होता. त्यामुळे आता सरकार बदलल्यानंतर बोनस रकमेतही बदल झाला. (22 thousand 500 rupees bonus to Mumbai Municipal Corporation employees this year)

गतवर्षीच्या बोनस रकमेत आणखीन अडीच हजाराने वाढ करून २२ हजार ५०० रुपये इतका बोनस देण्यात येणार आहे. त्यामुळे पालिका तिजोरीवर अंदाजे २२५ कोटींचा आर्थिक भार पडणार आहे. त्यामुळे यंदा पालिकेतील कर्मचाऱ्यांची दिवाळी आनंदात, उत्साहात व जल्लोषात साजरी होणार आहे.

- Advertisement -

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पालिकेतील कामगार संघटनांनी कौतुक केले आहे. तसेच, मुंबई महापालिका इंजिनिअर युनियनच्या वतीने संतोष धुरी, साईनाथ राजाध्यक्ष यांनी, कामगार नेते ऍड.प्रकाश देवदास आदींनीही मुख्यमंत्री शिंदे यांचे व इंजिनिअर युनियनचे नेते खासदार राहुल शेवाळे यांचे आभार व्यक्त केले आहेत.

वास्तविक, पालिकेतील कामगार संघटनांच्या कामगार नेत्यांची बुधवारी पालिका मुख्यालयात आयुक्त इकबाल चहल यांच्यासोबत दिवाळी बोनसबाबत बैठक झाली होती. या बैठकीत कामगार नेत्यांनी पालिकेकडे २५ हजार रुपये बोनस देण्याची मागणी केली होती. मात्र पालिका आयुक्त चहल यांनी गतवर्षीप्रमाणे २२ हजार रुपये बोनस देण्याचे आश्वासन दिले होते.

- Advertisement -

या बोनसचा लाभ पालिकेतील १ लाख २ हजार कर्मचाऱ्यांना होणार आहे. त्यामुळे पालिकेच्या तिजोरीवर अंदाजे २०० कोटी रुपयांचा आर्थिक भार पडणार होता. मात्र कामगार व नेते हे समाधानी नव्हते. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी सह्याद्री अतिथीगृह येथे पालिकेतील कामगार संघटनेच्या नेत्यांची महत्वपूर्ण बैठक घेतली.

या बैठकीत कामगारांना २२ हजार २०० रुपये, आरोग्य सेविकांना एक महिन्याच्या वेतना एवढा म्हणजे ९ हजार रुपये इतका बोनस देण्याचा निर्णय घेण्यात आला. सदर बैठकीप्रसंगी, शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे, किरण पावसकर आदी मान्यवर, पालिका आयुक्त इकबाल चहल, अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे, विविध कामगार संघटनांचे नेते शशांक राव, संदीप देशपांडे, संतोष धुरी, प्रकाश देवदास आदी मान्यवर उपस्थित होते.


हेही वाचा – अतिवृष्टीच्या निकषात न बसणाऱ्या बाधित शेतकऱ्यांना ७५५ कोटी रुपयांची मदत

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -