घरताज्या घडामोडीइस्रायलमध्ये वाढदिवसाच्या पार्टीत भारतीय वंशाच्या मुलाची चाकूने भोसकून हत्या

इस्रायलमध्ये वाढदिवसाच्या पार्टीत भारतीय वंशाच्या मुलाची चाकूने भोसकून हत्या

Subscribe

इस्रायलमध्ये एका अल्पवयीन भारतीय वशांच्या मुलाची वाढदिवसाच्या पार्टीत चाकूने भोसकून हत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. उत्तर इस्रायलमधील किरयत शमोना येथे ही घटना घडली. जोएल लेहिंगेल असे या मुलाचे नाव असून, जोएल लेहिंगेल आपल्या कुटुंबासह एक वर्षापूर्वी भारतातून इस्रायलच्यामध्ये आला होता.

इस्रायलमध्ये एका अल्पवयीन भारतीय वशांच्या मुलाची वाढदिवसाच्या पार्टीत चाकूने भोसकून हत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. उत्तर इस्रायलमधील किरयत शमोना येथे ही घटना घडली. जोएल लेहिंगेल असे या मुलाचे नाव असून, जोएल लेहिंगेल आपल्या कुटुंबासह एक वर्षापूर्वी भारतातून इस्रायलच्यामध्ये आला होता. तसेच, किरयत शानोमा शहरात राहत होता. (teen stabbed to death less than a year after immigrating from india)

मिळालेल्या माहितीनुसार, जोएल लेहिंगेल भारतातील एका मित्राला भेटण्यासाठी नोफ हगिल येथे गेला होता. जोएल लेहिंगेल हा भारतातील बेनी मेनाशे ज्यू समुदायाचा होता. हा समुदाय ईशान्येत राहणारा ज्यू समुदाय आहे.

- Advertisement -

स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार, बेनी मेनाचे समुदायातील 18 वर्षीय जोएल लेहिंगाहेलचे कुटुंब या वर्षाच्या सुरुवातीला इस्रायलमध्ये स्थलांतरित झाले. जोएल भारतातील इतर स्थलांतरितांना आणि त्याच्या मित्राला भेटण्यासाठी नोफ हगिल येथून किरयत शमोना शहरात गेला. त्यावेळी तो एका वाढदिवसाच्या पार्टीत गेला होता, तिथे उपस्थित अल्पवयीन मुलांमध्ये कशावरून तरी भांडण झाले. या लढ्यात सुमारे 20 मुलांचा सहभाग होता.

इस्रायलमधील भारतीय ज्यू स्थलांतरितांसोबत काम करणार्‍या मीर पालटियालेचा हवाला देत स्थानिक न्यूज पोर्टल Ynet ने वृत्त दिले, की जोएल शब्बातसाठी घरी परतणार होता, परंतु एका मित्राने शुक्रवारी स्थानिक वेळेनुसार सकाळी 7 वाजता त्याच्या कुटुंबाला फोन केला. फोन करून त्यांनी गुरुवारी रात्री वाढदिवसाच्या पार्टीत झालेल्या भांडणाची माहिती कुटुंबीयांना दिली. तसेच चाकूच्या हल्ल्यात घायेन जोएलचा रुग्णालयात मृत्यू कसा झाला हे देखील सांगितले.

- Advertisement -

13 ते 15 वयोगटातील मुलांना अटक

या प्रकरणी स्थानिक पोलिसांनी एका 15 वर्षीय मुलाला अटक केली आहे. या घटनेत त्याचा हात असल्याचा संशय आहे. टाईम्स ऑफ इस्रायलच्या वृत्तानुसार, वाढदिवसाच्या पार्टीत सहभागी झालेल्या इतर 7 मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे. प्रत्येकाचे वय 13 ते 15 वर्षांच्या दरम्यान आहे.

नॉप हॅग्लियलचे महापौर रोनेन प्लॉट यांनी जोएलच्या मृत्यूला “त्याच्या शहराचे नुकसान” म्हटले आहे. तो म्हणाला की जोएल एक आनंदी मुलगा होता. त्याला इस्रायली सैन्यात भरती व्हायचे होते. पण या हिंसक घटनेत त्याला आपला जीव गमवावा लागला, जी त्याच्या दृष्टीने दहशतवादी घटना आहे.

भारताच्या ईशान्य मणिपूर आणि मिझोराममध्ये राहणारा बेनी मेनाशे समुदाय ज्यू धर्माचे पालन करतो. अलीकडे या समुदायाचे लोक मोठ्या प्रमाणात इस्रायलमध्ये स्थलांतरित झाले आहेत. ही संख्या सुमारे 3,000 इतकी आहे. बेनी मेनाचे समुदाय 2700 वर्षांपूर्वी इस्रायलमधून गायब झालेल्या 10 जमातींपैकी एक असल्याचे मानले जाते.


हेही वाचा – सीएनजी-पीएनजीच्या दरात वाढ; सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -