घरमनोरंजन‘आदिपुरुष’च्या टीझर वर 'रामायण' मालिकेतील राम ही भूमिका साकारणारे अरुण गोविल संतापले

‘आदिपुरुष’च्या टीझर वर ‘रामायण’ मालिकेतील राम ही भूमिका साकारणारे अरुण गोविल संतापले

Subscribe

हिंदी टेलिव्हिजनवरील 90 च्या दशकातील लोकप्रिय रामायण मालिकेतील मुख्य अभिनेते अरुण गोविल यांनी आदिपुरुषच्या टीझरबाबत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे

टॉलिवूडचा सुपरस्टार प्रभास सध्या त्याच्या ‘आदिपुरूष’ चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. नुकत्याच काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला. तेव्हापासून प्रभासच्या ‘आदिपुरूष’ चित्रपटाला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं जात आहे. तसेच या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी देखील केली जात आहे. ज्यामुळे आता चित्रपटाच्या दिग्दर्शक आणि निर्मात्यांना समस्येचा सामना करावा लागत आहे. सामान्य व्यक्तिंपासून ते अनेक राजकीय नेत्यांपर्यंत या चित्रपटावर नाराजी व्यक्त केली जात आहे. नुकत्याच एक-दोन दिवसांपूर्वी 90 च्या दशकात रामानंद सागर यांच्या हिंदी टेलिव्हिजनवरील ‘रामायण’ मालिकेत सीता आणि लक्ष्मण ही भूमिका साकारणाऱ्या कलाकारांनी या चित्रपटावर आक्षेप घेतला होती. दरम्यान आता याचं मालिकेत प्रभु श्रीराम ही मुख्य भूमिका साकारणारे अभिनेते अरुण गोविल यांनी सुद्धा या चित्रपटाबाबत आपलं मत व्यक्त केलं आहे.

अरुण गोविल यांनी मांडलं मत
हिंदी टेलिव्हिजनवरील 90 च्या दशकातील लोकप्रिय रामायण मालिकेतील मुख्य अभिनेते अरुण गोविल यांनी आदिपुरुषच्या टीझरबाबत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, “रामायण, महाभारत, श्रीमद् भागवत यांसारखे जेवढे ग्रंथ आणि शास्त्र आहेत. ही आपली संस्कृती आणि धार्मिकता आहे. ही संस्कृतीच आपलं मूळ आहे. सर्व मानवता सभ्यतेसाठी हे मूळाप्रमाणे आहे. या मूळाला कोणीही हलवू शकत नाही, ना हे कोणी बदलू शकतं. आपल्या संस्कृतीच्या मूळाशी केलेली कोणतीही अपमानास्पद वागणूक दुर्देवी आहे. आपल्याला या शास्त्रांमधून संस्कार मिळतात. जीवनाचा आधार मिळतो. हे विचारच आपल्या जगण्याची कला शिकवते. आपली संस्कृती जगातील सगळ्यात प्राचीन संस्कृती आहे. आपल्या सर्व पिढ्या हे युगानुयुगे ते आत्मसात करत आहेत.”

- Advertisement -

अरुण गोविल पुढे म्हणाले की, “आपल्या धार्मिक मान्यतेला या महामारीने बळ दिलं. जवळपास अडीच वर्षांपूर्वी कोरोना काळामध्ये रामायण प्रसारित झाले होते आणि याने जागतिक रेकॉर्ड बनवला. 2020 मध्ये आपल्या युवा पिढीने देखील रामायण पाहिले आणि 35 वर्षांपूर्वी तयार करण्यात आलेल्या रामायणाला पूर्ण श्रद्धेने आत्मसात करण्यात आलं.”

‘आदिपुरुष’ या 5 भाषांमध्ये होणार प्रदर्शित
ओम राउत यांच्या दिग्दर्शनात तयार करण्यात आलेल्या ‘आदिपुरूष’ चित्रपटाने प्रभास श्रीरामाच्या मुख्य भूमिकेत होता. तर सीतेच्या भूमिकेत अभिनेत्री कृति सेनन आणि सैफ अली खान रावणाच्या भूमिकेत असणार आहे. हा चित्रपट 12 जानेवारी 2023 रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार असून हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम भाषेमध्ये प्रदर्शित होणार आहे. मात्र, सध्या या चित्रपटावर बहिष्काराची मागणी केली जात आहे.

- Advertisement -

हेही वाचा :

‘आदिपुरुष’ चित्रपटाला ‘रामायण’ मालिकेतील कलाकारांचा आक्षेप

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -