घरक्रीडाIPL 2023 Auction : 'या' दिवशी होणार खेळाडूंचा लिलाव

IPL 2023 Auction : ‘या’ दिवशी होणार खेळाडूंचा लिलाव

Subscribe

इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) 16 व्या पर्वाचे बिगूल वाजले आहे. लवकरच या आयपीएल 2023 स्पर्धेसाठी लिलाव करण्यात येणार आहे. या लिलावासाठी तारीखही जाहीर करण्यात आली आहे. यावर्षी सर्व संघ एक मॅच होम आणि एक विरोधी संघाच्या मैदानावर खेळणार आहेत.

इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) 16 व्या पर्वाचे बिगूल वाजले आहे. लवकरच या आयपीएल 2023 स्पर्धेसाठी लिलाव करण्यात येणार आहे. या लिलावासाठी तारीखही जाहीर करण्यात आली आहे. यावर्षी सर्व संघ एक मॅच होम आणि एक विरोधी संघाच्या मैदानावर खेळणार आहेत. आयपीएलचा लिलाव होणार असल्याने कोणत्या संघात कोणत्या नव्या खेळाडूंना संधी मिळणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. (Mini Auction of players for IPL 2023 on 16th December)

मिळालेल्या माहितीनुसार, आयपीएल 2023 चा लिलाव 16 डिसेंबर रोजी बेंगळुरूमध्ये होणार आहे. आयपीएल 2023 चा लिलाव 16 डिसेंबर रोजी बेंगळुरूमध्ये होणार आहे. आयपीएल 2022 च्या मेगा लिलावात संघांना 90 कोटी रुपये रक्कम मिळाली होती, परंतु यंदाच्या लिलावासाठी ते 95 कोटी रुपये केले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

- Advertisement -

दरम्यान यंदा आयपीएलमधील सर्व संघ एक मॅच होम आणि एक विरोधी संघाच्या मैदानावर खेळणार आहेत. हा फॉरमॅट सुरुवातीपासून सुरू होता. मात्र, कोरोनामुळे 2019 पासून या फॉरमॅटमध्ये स्पर्धा खेळवता आली नाही.

आयपीएलच्या पुढील 16 वा हंगाम मार्चच्या शेवटच्या आठवड्यात सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 2019 पासून पुढील दोन हंगाम भारताबाहेर आयोजित करण्यात आले होते. 2021 चा हंगाम भारतात सुरू झाला होता, परंतु कोरोना संसर्गाची प्रकरणे मध्यभागी आल्यानंतर हंगाम यूएईला खेळवण्यात आला.

- Advertisement -

दरम्यान, आयपीएल 2022 च्या मेगा लिलावात संघांना 90 कोटी रुपये रक्कम मिळाली होती. परंतु यंदाच्या लिलावासाठी ते 95 कोटी रुपये केले जाण्याची शक्यता आहे.


हेही वाचा – भारतीय महिलांना सातव्यांदा आशिया चषकाचा मान, स्मृती मानधनाचं अर्धशतक

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -