घरमहाराष्ट्रपुणेपुण्यातील पाषाण-सुस रोडवर भीषण अपघात; सुदैवाने जीवितहानी नाही

पुण्यातील पाषाण-सुस रोडवर भीषण अपघात; सुदैवाने जीवितहानी नाही

Subscribe

पुण्यातील पाषाण - सुस रोडवर एका मागोमाग एक सात ते आठ गाड्यांची धडक लागल्याची घटना घडली आहे. घडलेल्या घटनेत या गाड्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

सध्या दिवसेंदिवस वाहतूक कोंडी वाढत आहे. पुण्यात सुद्धा सातत्याने मागील काही दिवसांपासून वाहातून कोंडी वाढत आहे आणि त्यातच पावसाचेही प्रमाण वाढल्याने वाहतूक कोंडीत अधिक भर पडत आहे. अशातच पुण्यात पाषाण – सुस परिसरात आज भीषण अपघात घडल्याची घटना घडली आहे. यात पाच जण जखमी झाले आहेत

हे ही वाचा –  मंत्री महोदयांच्या उपचारांदरम्यान रुग्णालयात ‘बत्तीगुल’, केला ‘हा’ उपाय

- Advertisement -

पुण्यातील पाषाण – सुस रोडवर एका मागोमाग एक सात ते आठ गाड्यांची धडक लागल्याची घटना घडली आहे. घडलेल्या घटनेत या गाड्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या अपघातात शिवशाही बसचाही समावेश आहे. सोबतच चार चाकी गाड्यांचाही समावेश आहे.

 दरम्यान बोरिवली ते सातारा मार्गे जाणाऱ्या शिवशाही बसचा अचानक ब्रेक फेल झाला. यामुळे एसटी ने समोर असलेल्या गाड्यांना धडक दिली. या धडकेत 4 ते 5 जण जखमी असून त्यांना जवळच्या रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. या अपघातात चार चाकी गाड्या आणि एका मोटार सायकलचाही समावेश आहे. अपघातात या सर्व वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या घटनेचा पोलिस अधिक तपास घेत आहेत. या घटनेचा व्हिडीओसुद्धा समोर आला आहे.

- Advertisement -

हे ही वाचा –  भाजपने ती निवडणूक लढवू नये; राज ठाकरेंची उपमुख्यमंत्री फडणवीसांना पत्राद्वारे विनंती

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -