घरक्रीडामोठी बातमी! बीसीसीआयच्या अध्यक्षपदी रॉजर बिन्नींची नियुक्ती

मोठी बातमी! बीसीसीआयच्या अध्यक्षपदी रॉजर बिन्नींची नियुक्ती

Subscribe

मागील काही दिवसांपासून बीसीसीआयच्या अध्यक्षपदावर विराजमान होण्याबाबत चर्चांना उधाण येत आहे. परंतु या चर्चांवर आता पूर्णविराम लागणार आहे. कारण भारतीय क्रिकेट संघाचे माजी स्टार आणि 1983 च्या विश्वचषक विजेत्या संघाचे सदस्य रॉजर बिन्नी यांची आज भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) 36 व्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

मुंबईत झालेल्या बीसीसीआयच्या एजीएम मिटींगमध्ये त्यांच्या नियुक्तीची घोषणा करण्यात आली. बिन्नीने भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीची जागा घेतली आहे. 67 वर्षीय रॉजर बिन्नी हे बीसीसीआयच्या अध्यक्षपदासाठी नामांकन दाखल करणारे एकमेव उमेदवार होते.

- Advertisement -

आयसीसी अध्यक्षपदासाठी नामांकनाची अंतिम तारीख 20 ऑक्टोबर आहे. मेलबर्नमध्ये 11 ते 13 नोव्हेंबर दरम्यान आयसीसी बोर्डाची बैठक होणार आहे. बीसीसीआयच्या इतर पदाधिकाऱ्यांमध्ये सचिव जय शाह, आशिष शेलार, राजीव शुक्ला (उपाध्यक्ष) आणि देवजीत सैकिया (सहसचिव) यांचा समावेश आहे. मावळते कोषाध्यक्ष अरुण धुमाळ आयपीएलचे नवे अध्यक्ष असतील. तर जय शाह बीसीसीआयचे सचिव म्हणून काम पाहतील आणि आशिष शेलार यांच्याकडे खजिनदारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

- Advertisement -

रॉजर बिन्नी हे कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष होते आणि आता ते राज्य संघटनेतील त्यांच्या पदावरून पायउतार होणार आहेत. 1983 मध्ये भारताच्या ऐतिहासिक विश्वचषक विजयाच्या नायकांपैकी ते एक आहेत. त्यांनी विश्वचषकादरम्यान 8 सामन्यांत 18 विकेट घेतल्या आहेत.

बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार, सौरव गांगुलीला आयपीएलच्या अध्यक्षपदाची ऑफर देण्यात आली होती, परंतु त्याने नम्रपणे ही ऑफर नाकारली. त्याच संस्थेचे प्रमुख झाल्यानंतर बीसीसीआयमधील उपसमितीचे प्रमुखपद स्वीकारणे त्यांना शक्य होणार नाही, असा त्यांचा युक्तिवाद होता. त्याने या पदावर कायम राहण्याची इच्छा व्यक्त केली होती.


हेही वाचा : कगिसो रबाडाने हिंदीतून केली सासू-सासऱ्यांची मनधरणी, व्हिडीओ व्हायरल


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -