घरदेश-विदेशहॅरी पॉटर फेम 'प्रोफेसर स्नेप' यांच्या 'या' वस्तूंचा लिलाव

हॅरी पॉटर फेम ‘प्रोफेसर स्नेप’ यांच्या ‘या’ वस्तूंचा लिलाव

Subscribe

हॅरी पॉटर या लोकप्रिय हॉलीवूडपटामध्ये प्रोफेसर स्नेपची भूमिका साकारणारे अॅलन रिकमॅन यांचे दोन वर्षांपूर्वी निधन झाले. अनेक वर्षांपासून कॅन्सरशी लढा देत असूनही, रिकमॅन यांनी हॅरी पॉटर सिनेमातील त्यांची भूमिका तितक्याच ताकदीने वठवली होती. रिकमॅन यांच्या दमदार अभिनयामुळे त्यांनी साकारलेला प्रोफेसर स्नेप आजही लोकांच्या मनात जिवंत आहे. मात्र, एका खास निमित्ताने पुन्हा एकदा रिकमॅनच्या आठवणींना उजाळा मिळाला आहे.

रिकमॅन यांच्या चाहत्यांसाठी खुशखबर!

हॅरी पॉटरमधील प्रोफेसर स्नेप साकारणारे अभिनेते अॅलन रिकमॅन यांच्या जगभरातील चाहत्यांसाठी एक खुशखबर आहे. लवकरच रिकमॅन यांच्या खासगी वस्तूंचा लिलाव करण्यात येणार आहे. यामध्ये रिकमॅन यांच्या खासगी डायरीज तसेच त्यांच्या अन्य काही वस्तू आणि हॅरी पॉटर सिनेमातील त्यांच्या स्क्रिप्ट्स या गोष्टींचा प्रामुख्याने समावेश आहे. याशिवाय बिल क्लिंटन तसेच प्रिन्स चार्ल्स आदी दिग्गजांनी रिकमॅन यांना लिहिलेल्या खासगी पत्रांचाही लिलाव करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या सर्व गोष्टींचा लिलाव, तब्बल ९ लाख ५० हजार पाउंड्स इतक्या भरघोस किंमतीला होणार असल्याचे समजते आहे. भारतीय चलनानुसार याची किंमत साधारणत: ८ कोटी ५४ लाख इतकी असेल.

- Advertisement -
दिवंगत अभिनेते – अॅलन रिकमॅन
प्रेक्षकांच्या मानत आजही जिवंत

ब्रिटिश अभिनेते अॅलन रिकमॅन यांचे वयाच्या ६९ व्या वर्षी कर्करोगाने निधन झाले.  हॅरी पॉटर या लोकप्रिय सिनेमाच्या मालिकेत रिकमॅन यांनी प्रोफेसर सिव्हरस स्नेप ही नकारात्मक भूमिका साकारली होती. मात्र, या भूमिकेला जगभरातील लोकांची अफाट पसंती मिळाली. मोठ्या पडद्यावर व्हिलन साकारणे आणि तो लोकांना भावणे हे अत्यंत आव्हानात्नक असते. मात्र, रिकमॅन या दोन्ही कसोटींवर शंभर टक्के खरे उतरले. हॅरी पॉटरमधील नायकासमोर रिकमॅन यांनी तितक्याच ताकदीचा खलनायक उभा केला. किंबहुना यामुळेच त्यांनी साकारलेला प्रोफेसर स्नेप आजही लोकांच्या मनात जिवंत आहे.

अॅलन रिकमॅल यांच्या अन्य गाजलेल्या भूमिका

हॅरी पॉटर व्यतिरिक्त रिकमॅन यांनी ‘डाय हार्ड’ या चित्रपटात साकारलेली हॅन्स ग्रबर यांची भूमिका देखील विशेष गाजली होती. याशिवाय त्यांनी साकारलेल्या मुख्य ५ लोकप्रिय भूमिका-

- Advertisement -

सिनेमा                                                भूमिका

ट्रूली, मॅडली, डिपली                              जॅमी
रॉबीन हूड                                         शेरिफ ऑफ नॉटहींगन
मायकिल कोलिन्स                                 इमॉन दि वेलेरा
गॅलक्सी क्वेस्ट                                      डॉ. लॅझोरुस / अॅलेक्सँडर डेन
लव्ह अॅक्चुअली                                    हॅरी

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -