घरदेश-विदेशपंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून पाच दिवस मॅरेथॉन दौऱ्यावर, भरगच्च कार्यक्रमांची यादी जाहीर

पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून पाच दिवस मॅरेथॉन दौऱ्यावर, भरगच्च कार्यक्रमांची यादी जाहीर

Subscribe

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून मॅरेथॉन दौऱ्यावर जाणार आहेत. पाच दिवसांत ते तीन राज्यांत जाणार असून जवळपास एक डझनभर कार्यक्रमांना हजेरी लावणार आहेत. आजपासून त्यांचा गुजरात दौरा सुरू होणार आहे. पंतप्रधानांच्या ऑफिसमधून सांगण्यात आले की, मोदी सर्वांत आधी गांधीनगरमधील महात्मा मंदिर कन्व्हेन्शन आणि एक्झिबिशन सेंटरमध्ये संरक्षण प्रदर्शन – 2022 चे उद्घाटन करतील. तसंच आज ते पाच वेगवेगळ्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.

हेही वाचा – शशी थरुर की मल्लिकार्जुन खर्गे? २४ वर्षांनंतर आज ठरणार बिगर गांधी कुटुंबातील काँग्रेसचा अध्यक्ष

- Advertisement -

संरक्षण प्रदर्शनाला पंतप्रधान सर्वप्रथम उपस्थित राहणार आहेत. एक भारतीय पॅव्हेलियन आणि दहा राज्य पॅव्हेलियन असतील. भारतीय पॅव्हेलियनमध्ये पंतप्रधान हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) द्वारे डिझाइन केलेल्या HTT-40 या स्वदेशी ट्रेनर विमानाचे अनावरण करतील. विमानात अत्याधुनिक रणनीतिक प्रणाली असून ते वैमानिक अनुकूल वैशिष्ट्यांसह डिझाइन केलेले आहे. कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधान उद्योग आणि स्टार्टअप्सच्या माध्यमातून अंतराळ क्षेत्रातील संरक्षण दलांसाठी नाविन्यपूर्ण उपाय विकसित करण्यासाठी मिशन डेफस्पेस लॉन्च करणार आहेत.

गुजरातमधील डीसा एअरफील्डची पायाभरणीही पंतप्रधान करणार आहेत. या फॉरवर्ड एअर फोर्स बेसमुळे देशाच्या सुरक्षा पायाभूत सुविधा मजबूत होतील. त्यानंतर ते अडालज येथील त्रिमंदिर येथे ‘मिशन स्कूल्स ऑफ एक्सलन्स’ सुरू करतील. मिसिंग लिंक्सच्या बांधकामासाठी तसेच कोस्टल हायवेच्या सुधारणांसाठी ते पायाभरणी करणार आहेत. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात 13 जिल्ह्यांमध्ये एकूण 270 किलोमीटरपेक्षा जास्त लांबीचे महामार्ग समाविष्ट केले जातील.

- Advertisement -

जुनागडमध्ये दोन पाणीपुरवठा प्रकल्प आणि कृषी उत्पादनांच्या साठवणुकीसाठी गोदाम संकुलाच्या बांधकामाची पायाभरणी पंतप्रधान करणार आहेत. माधवपूर, पोरबंदर येथील श्री कृष्ण रुक्मणी मंदिराच्या सर्वांगीण विकासासाठी ते पायाभरणी करणार आहेत. ते पोरबंदर फिशरी हार्बर येथे सांडपाणी आणि पाणीपुरवठा प्रकल्प आणि देखभाल ड्रेजिंगची पायाभरणीही करतील. माधवद येथील मासेमारी बंदराच्या विकासासह गीर सोमनाथ येथे दोन प्रकल्पांची पायाभरणी करणार आहेत.

हेही वाचा – IRCTCची प्रवाशांसाठी नवीन ऑफर; पहिल्यांदा प्रवास, मग पेमेंट

सायंकाळी 6 वाजता, पंतप्रधान मोदी राजकोटमध्ये गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने आयोजित केलेल्या “इंडियन अर्बन हाऊसिंग कॉन्क्लेव्ह-2022” चे उद्घाटन करणार आहेत. तंत्रज्ञानाचे प्रदर्शन करण्यासाठी तसेच तंत्रज्ञान सामग्री आणि प्रक्रियांच्या विविध पर्यायांबद्दल विचारपूर्वक मांडण्यासाठी हा कार्यक्रम उत्तम व्यासपीठ ठरणार आहे. या कार्यक्रमात 200 हून अधिक तंत्रस्नेही मंडळी सहभागी होण्याची शक्यता आहे. तसंच, यानंतर मोदी राजकोटमध्ये एका प्रदर्शनाचे उद्घाटनही करणार आहेत.

दोन दिवसांत ते गुजरातमध्ये सुमारे 15,670 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करणार आहेत. गुरुवार, 20 रोजी ते व्यारा येथे अनेक विकास उपक्रमांची पायाभरणी करतील आणि केवडिया येथे ‘मिशन लाइफ’ लाँच करणार आहेत.

हेही वाचा – केवळ सीमेअंतर्गत उपाययोजना नव्हे, आंतरराष्ट्रीय रणनीतीची गरज; इंटरपोलच्या महासभेत पंतप्रधानांचे प्रतिपादन

21 ऑक्टोबर रोजी उत्तराखंड दौऱ्यावर

२१ ऑक्टोबर रोजी पंतप्रधान सकाळी केदारनाथ आणि बद्रीनाथला पोहोचतील, जिथे ते 3,500 कोटी रुपयांच्या कनेक्टिव्हिटी प्रकल्पांची पायाभरणी करतील. यादरम्यान ते केदारनाथ आणि बद्रीनाथ मंदिरांना भेट देतील. यानंतर ते 9 वाजता केदारनाथ रोपवे प्रकल्पाची पायाभरणी करतील. पंतप्रधान आदिगुरू शंकराचार्यांच्या समाधी स्थळालाही भेट देतील आणि मंदाकिनी आणि सरस्वती नदीच्या काठावर सुरू असलेल्या विकासकामांचा आढावा घेतील. यानंतर पंतप्रधान 11.30 च्या सुमारास बद्रीनाथला पोहोचतील आणि त्यानंतर तेथे पूजा आणि दर्शन घेतील.

पंतप्रधान तेथील रिव्हरफ्रंट विकास कामाच्या प्रगतीचा आढावा घेतील आणि माना गावात रस्ता आणि रोपवे प्रकल्पाची पायाभरणी करणार आहेत. यानंतर दुपारी दोनच्या सुमारास पंतप्रधान ‘अरायव्हल प्लाझा’ आणि तलावांच्या विकासकामांचाही आढावा घेतील.

 २२ तारखेला मध्य प्रदेशात

धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मध्य प्रदेशातील सतना जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत 4.5 लाख लाभार्थी आभासी माध्यमातून मिळणार आहेत. यावेळी मुख्य कार्यक्रम सतना येथील बीटीआय मैदानावर होणार असल्याचे राज्याचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सांगितले. विशेष म्हणजे 35 दिवसांत पंतप्रधान तिसऱ्यांदा राज्यातील जनतेशी संवाद साधणार आहेत.

२३ रोजी अयोध्येत रामललाचे दर्शन घेणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी 23 तारखेला अयोध्येला पोहोचणार आहेत. तेथे रामलल्लाची पूजा करून दर्शन घेतील. यानंतर राम जन्मभूमी तीर्थक्षेत्राची पाहणी करतील. यादरम्यान प्रभू श्रीराम राज्य अभिषेकात सहभागी होणार आहेत. संध्याकाळी, शरयूच्या काठावर बांधलेल्या नवीन घाटावर पंतप्रधान भव्य आरती दीपोत्सव सोहळ्यात सहभागी होतील.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -