घरताज्या घडामोडीअलिबागमधील आरसीएफ कंपनीत भीषण स्फोट, 3 ठार तर 4 गंभीर जखमी

अलिबागमधील आरसीएफ कंपनीत भीषण स्फोट, 3 ठार तर 4 गंभीर जखमी

Subscribe

अलिबागमधील थळ, वायशेत येथील आरसीएफ कंपनीत स्फोट झाल्याची धक्कादायक घटना घडली. बुधवारी संध्याकाळी 5 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. या अपघातात एक मॅनेजमेंट ट्रेनीसह अन्य दोघांचा जागीच मृत्यू झाला.

अलिबागमधील थळ, वायशेत येथील आरसीएफ कंपनीत स्फोट झाल्याची धक्कादायक घटना घडली. बुधवारी संध्याकाळी 5 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. या अपघातात एक मॅनेजमेंट ट्रेनीसह अन्य दोघांचा जागीच मृत्यू झाला. तसेच, 4 जण गंभीर जखमी झाले असून, त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

केंद्र शासनाच्या अखत्यारीत असलेल्या आरसीएफ कंपनीत गॅस टर्बाइन युनिटच्या रेफ्रिजरेशन स्टीम प्लांटमध्ये स्फोट झाला. या स्फोटात साजिद महंमद सिद्धकी, जितेंद्र, अतिंदर या तिघांचा मृत्यू झाला आहे. तसेच, दिलसाद आलम इंडीसी, फलझान शेख, शर्मा आणि अन्य एकजण गंभीर जखमी झाले आहेत.

- Advertisement -

खत निर्मिती करणारा केंद्र शासनाचा आरसीएफ प्रकल्प अलिबाग तालुक्यातील थळ येथे आहे. या कंपनीत नवीन वातानुकुलित यंत्रणा (एसी) कार्यान्वित करण्याचे काम मेसर्स एरिझो ग्लोबल या कंपनीस दिले होते. या कंपनीचे कर्मचारी हे गॅस टर्बाइन युनिटच्या रेफ्रिजरेशन स्टीम प्लांटमध्ये काम करीत होते. या कर्मचार्‍यासोबत कंपनीचा कर्मचारीही होता.

या प्लांटमध्ये एसी बदलण्याचे काम करत असताना अचानक स्फोट झाला असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे. स्फोट झाल्याची माहिती मिळताच अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. दरम्यात या स्फोटात मृत्यू किती जणांचे झाले आणि जखमी किती झाले याबाबत प्रशासनाकडून कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही

- Advertisement -

आरसीएफ स्फोटात दुखापत झालेल्या व्यक्तींची माहिती –

  • अतिंद्र – कुर्ला पश्चिम, 90 टक्के भाजलेले, नॅशनल बोन्स ऐरोली या इस्पितळात उपचारार्थ दाखल
  • जितेंद्र शेळके – भोनंग, नॅशनल बोन्स ऐरोली या इस्पितळात उपचारार्थ दाखल
  • साजिद सिद्दिक सलामती – कुर्ला पश्चिम, वय 23, फोर्टिस हॉस्पिटल, मुंबई, या इस्पितळात उपचारार्थ दाखल

हेही वाचा – मुंबईत तीन ठिकाणी बॉम्बस्फोटांच्या धमकीचा फोन, पोलिसांकडून तपास सुरू

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -